कोल्हापूर : प्रतिनिधी : आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे धोरण असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे उपमुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. (Shivsainik)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे हे माझे ४० वे वर्ष आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात शिवसैनिक उपस्थित असायचे. हेच विचार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसैनिकांना मिळत आहेत. दसरा मेळावा हा शिवसेनेचा विजयोत्सव असून, आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे हजारो शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहतील, असे सांगितले. (Shivsainik)
शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीला महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, शहरप्रमुख अमरजा पाटील, पूजा भोर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, रमेश पुरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक अमोल माने, माजी नगरसेवक अजित मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, सामाजिक कार्यकर्ते अजय इंगवले, नेपोलियन सोनुले, आश्पाक आजरेकर, सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंग्रस, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, अंकुश निपाणीकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shivsainik)