Home » Blog » Shivaji University : ‘शिवाजी विद्यापीठ’ प्रश्नी शिवप्रेमीचे आंदोलन  

Shivaji University : ‘शिवाजी विद्यापीठ’ प्रश्नी शिवप्रेमीचे आंदोलन  

शिवाजी विद्यापीठाचा परिसर घोषणांनी दणाणला

by प्रतिनिधी
0 comments
Shivaji University

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ‘आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’ या घोषणेने शिवाजी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. बुधवारी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी  आणि ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम रहावे यासाठी शिवप्रेमी तसेच विविध संघटनांनी विद्यापीठ आवारातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत आंदोलन केले. आंदोलकांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.  शिर्के यांना निवेदन देण्यात आले. (Shivaji University)

        निवेदनामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते त्यावेळी शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्यासंदर्भात विविध अनुषंगाने झालेल्या सर्व घटनांची माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जनतेच्‍या वतीने “शिवाजी विद्यापीठ” हेच नाव विद्यापीठास कायम रहावे व शिवाजी विद्यापीठ नावात कोणताही नामविस्तार करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. (Shivaji University)

   आंदोलनामध्ये सिनेट सदस्य बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य, सुटा संघटना, कर्मचारी महासंघ,प्राचार्य संघटना,संस्था चालक संघटना,मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना,विद्यार्थी संघटना, प्राथमिक मााध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी संघटना, मराठा महासंघ आणि इतर शिवप्रेमी संघटना सहभागी झाल्या होत्या. (Shivaji University)

     आंदोलनात शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  माजी महापौर आर. के. पोवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,  कॉ. चंद्रकांत यादव, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण,अभिषेक मिठारी डॉ शानेदिवान, प्राचार्य डी. यू. पवार, ॲड अजित पाटील, हर्षल सुर्वे, सतीश कांबळे, मिलिंद भोसले, बाबुराव कदम, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, डी. आर. मोरे, व्ही एम पाटील, आनंद खामकर, अवधूत साळोखे ,श्वेता परुळेकर, शुभम शिरहट्टी, अनिकेत घोटणे, विराज पाटील, विशाल देवकुळे, अनिल माने, व्यंक्कपा भोसले, भारती पोवार, सरलाताई पाटील, वैशाली कदम, प्रा. टी एस पाटील, रवी जाधव आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (Shivaji University)

हेही वाचा :

स्वयंसिद्धाच्या संस्थापिका कांचन परुळेकर यांचे निधन

मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कोरटकरची कबुली!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00