नवी दिल्ली : प्रतिनिधी : खासदार शशी थरुर यांचे राहूल गांधीसोबत मतभेद उफाळून आले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय चर्चा सुरू असताना थरुर यांनी आज गुरुवारी राहूल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. केरळ विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी आणि थरुर यांच्यात पॅचअप झाल्याचे बोलले जाते.
खासदार थरुर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या बैठकींना दांड्या मारल्या आहेत. थरुर हे हायकमांडवर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असताना आज थरुर यांनी संसद भवनातील खर्गे यांच्या कार्यालयात लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीत थरुर यांची नाराजी दूर झाली असल्याचे बोलले जात आहे. (Shashi Tharoor met with Rahul Gandhi and Kharge)
गांधी आणि खर्गे यांना भेटण्यापूर्वी थरुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आत्ताच संसदेत जाणार आहे. माझ्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्याला भेटण्यात चूक काय? मी हायकमांडशी नियमित संवाद ठेऊन असल्याचा दावाही त्यांनी केला. (Shashi Tharoor met with Rahul Gandhi and Kharge)
हायकमांडशी भेट झाल्यानंतर थरुर यांनी खर्गे आणि राहूल गांधी यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला. त्यात त्यांनी असे म्हटले आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहूल गांधी यांच्याबरोबर विविध मुद्द्यावर चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सर्वजण देशाच्या सेवेसाठी एकाच विचाराने पुढे जात आहोत असे त्यांनी म्हटले आहे. (Shashi Tharoor met with Rahul Gandhi and Kharge)