Home » Blog » शरद पवार प्रकृती अस्वस्थामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल 

शरद पवार प्रकृती अस्वस्थामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल 

by प्रतिनिधी
0 comments
Sharad Pawar admitted to the hospital

मुंबई: प्रतिनिधी : जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी दुपारी त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना खोकला व श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बारामतीहून तातडीने पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या सर्व तपासणी करण्यात येणार असून त्यांना कोणासही भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

  १० दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने पवार कुटूंबीय पुन्हा चर्चेत आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनकरणाचा मुद्दा अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याला असलेला विरोधामुळे राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्याबाबत पवार कुटुंबीयांकडून १० व १२ फ्रेब्रुवारी रोजी  आमदार रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे करणार असल्याने त्याबाबत उत्सुकता लागून राहिलेली असतानाच आज थोरल्या पवारांची प्रकृती बिघडली.  (Sharad Pawar admitted to the hospital) 

 बारामतीमध्ये असताना त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत आहे.  सकाळी डॉक्टरांची एका पथकाने तपासणी केली. दुपारीपर्यत त्यांच्या प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी पवार कारमधून उतरून व्हिल चेअरने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. पवार यांच्या प्राथमिक तपासण्यांचा अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर उपचार काय करावा, याचा निर्णय घेणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार केले जातील, असे, सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar admitted to the hospital) 

 पवार यांच्या प्राथमिक तपासण्यांचे काही रिपोर्ट समोर आले आहेत. सध्यातरी कोणतीही चिंतेची बाब नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून मॉनिटरवर दिसणाऱ्या मोजमापांनुसार शरद पवार यांच्या हृदयाचे ठोके (हार्ट रेट) सुमारे ७४ प्रति मिनिट आहेत. हा रिपोर्ट प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य मर्यादेत आहे ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे ९८ टक्के आहे. ही पातळी सामान्य असून रक्तातील ऑक्सिजन पुरेसा असल्याचे दर्शवते. श्वसनगती (रिस्पायरेटरी रेट) सुमारे २६ प्रति मिनिटे असून ही संख्या सामान्यपेक्षा जास्त आहे. प्रौढांसाठी हे प्रमाण साधारण १२–२० प्रति मिनिटे असते. म्हणजेच श्वसन वेग वाढलेला आहे. या आकडेवारीनुसार रुग्णाचे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर व समाधानकारक आहेत. मात्र, श्वसन वेग वाढलेला दिसतो, असे सांगण्यात येत आहे. (Sharad Pawar admitted to the hospital) 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00