कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. शरद पवार २३ रोजी तर सुप्रिया सुळेंचा दौरा २४ तारखेला आहे. (Sharad Pawar)
शरद पवार गुरुवारी, २३ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी चार वाजता शिवाजी विद्यापीठाच्या जिजाऊ बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या व्हाईट आर्मी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंचशील हॉटेल येथे सायंकाळी सात वाजता राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा-विचारविनिमय करणार आहेत. गुरुवारी पवारांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शुक्रवारी २४ रोजी ते सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.(Sharad Pawar)
खासदार सुप्रिया सुळे २४ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यात येत आहेत. सकाळी अकरा वाजता न्यू पॅलेस येथील डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराराणी ताराराणी’ या संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशन समारंभास सुळे उपस्थित राहणार आहेत. खासदार सुळे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. रेल्वे स्टेशन समोरील रॉयल मिरज आर्के्ड बिल्डिंगमधील हॉलमध्ये मेळावा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्या कराडकडे प्रयाण करणार आहेत.(Sharad Pawar)
हेही वाचा :
बेळगावात महात्मा गांधींचा २५ फुटी पुतळा