इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका जाहीरसभेत विकासात भारताला मागे टाकू असे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला एक महान राष्ट्र बनवण्याचे वचनही त्यांनी दिले. त्यांनी शांतता आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याची गरजही व्यक्त केली.(Shahbaj sheriff)
‘विकासात भारताला मागे टाकेन’ हे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. पाकिस्तानातील डेरा गाझी खान येथे अनेक विकास प्रकल्पाचे उदघाटन शरीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शरीफ म्हणाले, “जर आपण भारताला मागे टाकले नाही तर तर माझे नाव शाहबाज शरीफ नाही. आपण पाकिस्तानला एक महान राष्ट्र बनवू आणि भारताला मागे टाकू.” (Shahbaj sheriff)
ते म्हणाले, “मी नवाज शरीफ यांचा चाहता, अनुयायी आहे. जोपर्यंत माझ्यात काम करण्याची उर्जा आणि इच्छाशक्ती आहे. तोपर्यंत आपण सर्वजण पाकिस्तानला महान राष्ट्र बनवण्यासाठी आणि भारताला पराभूत करण्यासाठी एकत्र काम करू.”
भाषणात शरीफ यांनी सांगितले की सध्याची आर्थिक स्थैर्यता असूनही दहशतवादाचा सामना केल्याशिवाय पाकिस्तानची प्रगती अशक्य आहे. विकासासाठी शांतता आवश्यक आहे. देशाचे सरकार दक्षिण पंजाबसह सर्व प्रदेशाचा संतुलित विकास आणि समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी माझे जीवन समर्पित करणार आहे. (Shahbaj sheriff)
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मिरी जनतेला आपला अढळ नैतिक व राजनैतिक पाठिंबा कायम ठेवत भारतासोबत काश्मिरसह सर्व मुद्दे चर्चेद्वारे सोडवायचे आहेत असे वक्तव्य नुकतेच केले. त्यानंतरच्या काही आठवड्यात शरीफ यांनी हे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा :
बॉम्बच्या धमकीने विमान रोमला वळवले