मोहाली : शेजाऱ्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुण शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. अभिषेक स्वर्णकार असे शास्त्रज्ञाचे नाव असून ते ३९ वर्षाचे होते. पंजाब राज्यातील मोहालीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ) या संस्थेने त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Scientist Death)
अभिषेक स्वर्णकर हे झारखंडचे रहिवासी आहेत. ते परदेशात संशोधन करत होते. प्रकृती अस्वास्थामुळे ते भारतात परतले. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रियेद्वारे मुत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. त्यांच्या दोन विवाहित बहिणीपैकी एका बहिनीने किडनी दान केली आहे. सध्या ते डायलिसिसवर होते. (Scientist Death)
मोहालीमध्ये ते सेक्टर ६६ मध्ये भाड्याच्या घरात वृद्ध पालकांसह रहात होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मोंटी नावाच्या व्यक्तीला अभिषेक स्वर्णकर यांच्या प्रकृतीची माहिती असून त्याने त्यांच्यावर हल्ला केला. हा वाद पाकिंगच्या वादावरुन झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे. हा वाद सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Scientist Death)
मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोंटी आणि अभिषेक यांच्यात वाद सुरू आणि वाढला. मोंटीनी अभिषेक यांना जमिनीवर पाडले आणि त्यांना जबर मारहाण केली असे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. प्रत्यक्षदर्शी रोमा यांनी अशी माहिती दिली की, “मी मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकला आणि घराबाहेर आलो. तेव्हा मोंटी अभिषेकवर हल्ला करताना पाहिले. तो जमिनीवर पडला असतानाही मोंटी छातीवर जोरात ठोसे मारत होता. अभिषेक बेशुद्ध झाल्यावर मोंटी घाबरला आणि त्यानेच अभिषेकला हॉस्पिटलमध्ये नेले” असे रोमा यांनी सांगितले. (Scientist Death)
मोंटीने स्वत:च्या कारने अभिषेक यांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलला जाताना त्याने एका वाहनाला ठोरकरही दिली. हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अभिषेक यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अभिषेकच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिस ठाण्यातील ऑफिसर गगनदीप यांनी सांगितले. गुरुवारी शवविच्छेदन झाल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. (Scientist Death)
शास्त्रज्ञ अभिषक स्वर्णकार यांचे ‘जर्नल ऑफ सायन्स’ मध्ये त्याचे लेख प्रसिद्ध झाले होते. आयआयएसईआरने त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून “आम्ही एक तेजस्वी शास्त्रज्ञ गमावला आहे. हिसांचाराचे असे कृत्य अस्वीकार्य आहे. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे” असे म्हटले आहे. (Scientist Death).
हेही वाचा :
मानवी तस्करीचा प्रयत्न; ‘प्राध्यापका’ला अटक