Home » Blog » Maharashtra Politics : सांगलीच्या राजकारणात ‘दुष्काळी दबावा’चा पट्टा

Maharashtra Politics : सांगलीच्या राजकारणात ‘दुष्काळी दबावा’चा पट्टा

दुष्काळी प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय सुकाळ आणला. त्यांच नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा गाठीभेटी वाढवल्या आहेत.

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Politics

सांगली : प्रतिनिधी
एकेकाळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दुष्काळी प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय सुकाळ आणला. त्यांच नेत्यांनी आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गाठीभेटी वाढवल्या आहेत. भाजपवर नाराज असलेल्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत दबावगट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics)

विधानसभा निवडणुकीतही ताकद दाखवण्याचा इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या दुष्काळी फोरममधील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीतही ताकद दाखवण्याचा इशारा दिला आहे. यासाठी फोरममधील काही नेत्यांची बैठक झाली. यावेळी विलासराव जगताप, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेत्यांनी दुष्काळी फोरम नावाने एक स्वतंत्र गट स्थापन केला आहे. पूर्वी या गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळाली होती. मात्र, या गटातील जवळपास सर्वच नेते गेल्या काही वर्षांत भाजप, शिवसेनेत गेले. त्यानंतर हा फोरम शांत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या फोरमने आपली ताकद दाखविली.

भाजपमध्ये असलेले या फोरमधील नेते पक्षाबद्दल काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या कार्यपद्धतीवर होती. पृथ्वीराज देशमुख आणि जगताप यांनी पक्षाकडे अनेक तक्रारी केल्या. पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली; पण या नेत्यांच्या नाराजीची दखल भाजपने घेतली नाही. त्यांचा विरोध डावलून संजय पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर या नेत्यांनी उघडपणे पक्षाविरोधात जाऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. परिणामी, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. विरोधात काम करूनही भाजपने दुष्काळी फोरममधील या नेत्यांवर कारवाई केली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी भाजप सावध पावले टाकत असतानाच आता या फोरममधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख व अजितराव घोरपडे यांची बैठक पार पडली. आता विधानसभा निवडणुकीतही तीच भूमिका कायम ठेवण्यावर या बैठकीत नेत्यांची चर्चा झाली. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : काय आहे दुष्काळी फोरम

सांगली जिल्ह्यात दुष्काळी प्रश्नांचा पाठपुरावा करण्याच्या निमित्ताने हा फोरम स्थापन झाला. यामध्ये माजी खासदार संजय पाटील, माजी आ. विलासराव जगताप, दिवंगत अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे. दुष्काळी प्रश्नांचा पाठपुरावा सुरू असतानाच राजकीयदृष्ट्या हा फोरम अधिक प्रभावशाली बनत गेला. आता यातील नेते वेगवेगळ्या पक्षात गेले असले तरी आजही या गटाचे राजकीय महत्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00