मुंबई : हत्येच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार सलमान खानचे वांद्र्यातील घर आता बुलेटप्रुफ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांच्या खून खटल्यातील आरोपपत्रात सलमान खान हे बिश्नोई टोळीचे प्रमुख लक्ष्य होते, असे म्हटले आहे. सलमानभोवती प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते. त्याच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. (Salman’s House)
या पार्श्वभूमीवर सलमानच्या मुंबई वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी बुलेटप्रुफ ग्लासेस लावण्यात आले आहेत.
गेल्या १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या हत्याकांडात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, सिद्दीकींच्या हत्येचा कट हा बिश्नोईच्या गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार करण्याच्या रणनीतीचा भाग होता.
याच आरोपपत्रात सलमानला संपवण्याचाही कट रचल्याचा तपशील आहे. त्यामुळे त्याच्या घराची बाल्कनी आणि खिडक्यांवर बुलेटप्रुफ काचा बसवण्यात आल्या आहेत.(Salman’s House )
अलीकडे एप्रिलमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोघा बंदूकधाऱ्यांनी सलमान खानच्या निवासस्थानावर गोळीबार केला होता. त्यानंतर सलमानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात, गोळीबारामागील प्रमुख संशयित म्हणून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर संशय व्यक्त केला होता. हा हल्ला त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाची हत्या करण्याचा तो प्रयत्न होता, असेही त्यात म्हटले आहे.
सिद्दीकींचे सलमानसोबतचे तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असलेले कथित संबंध यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपपत्रात २६ जणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. तीन फरार संशयितांचीही ओळख पटली आहे. मोहम्मद यासिन अख्तर उर्फ सिकंदर, शुभम लोणकर उर्फ शुब्बू आणि अनमोल सिंग बिश्नोई उर्फ भानू अशी त्यांची नावे आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Bulletproof glass installed in the balcony of actor Salman Khan’s residence – Galaxy Apartment pic.twitter.com/x6BAvPOGyW
— ANI (@ANI) January 7, 2025
हेही वाचा :
पत्रकार हत्येतील प्रमुख आरोपीस अटक