Home » Blog » Salman Khan : बॉम्बने गाडी उडवण्याची सलमानला धमकी

Salman Khan : बॉम्बने गाडी उडवण्याची सलमानला धमकी

खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

by प्रतिनिधी
0 comments
Salman Khan

मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडियावर त्याला त्याच्या घरावर हल्ला करण्याची आणि त्याची गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिस धमकी देणाऱ्या शोध घेत आहेत. लॉरेन्स बिष्णोईने धमकी दिली आहे का? या अँगलनेही पोलिस तपास करत आहेत.  (Salman Khan)

मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाला व्हॉटस् अप मेसेजद्वारे अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. व्हॉटस अप मेसेजमध्ये घरावर हल्ला करण्याची आणि गाडी उडवून देण्याची धमकी दिली आहे. या नवीन धमकीमुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून धमकी कुठून आली आणि कोणी दिली याचा छडा लावण्यास सुरूवात केली आहे. लॉरेन्स बिष्णोईकडून यापूर्वीच सलमानला धमक्या आल्या आहेत. (Salman Khan)

गतवर्षी एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या घरावर दोघांनी गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आमदार बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली. सलमान खाननेही घराच्या बाल्कनीत बुलेटप्रुफ काचा बसवल्या आहेत. (Salman Khan)

सलमानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमक्या येत आहेत. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. याचा बदला घेण्याची लॉरेन्स बिष्णोईने धमकी दिली आहे. (Salman Khan)

हेही वाचा :

१८०० कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

मेहुल चोक्सी ला बेल्जियममध्ये अटक

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00