Home » Blog » डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सर्वात जास्त घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सर्वात जास्त घसरण

४६ पैशाच्या घररणीनंतर डॉलर पोचला ८५.७३ वर

by प्रतिनिधी
0 comments
Dollar

नवी दिल्ली : आंतरबँकीय विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपया पडून ८५.३१ वर खुला झाला. पण बाजार सुरू झाल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने रुपया ८५.७३ वर पोचला. रुपयात ४६ पैशाची घसरण दिसून आली. ही एक दिवसातील सर्वात जास्त घसरण आहे. (Dollar)

अमेरिकन चलन मजबूत झाल्याने आणि विदेशी गुंतवणूक निरंतर बाहेर जाण्यामुळे शुक्रवारी (दि.२७) सुरुवातीला बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४६ पैसे घसरला. रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत ८५.७३ वर पोचली.

विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, महिन्याच्या शेवटी आणि वर्षाच्या शेवटी डॉलरची मागणी वाढल्याने डॉलर मजबूत झाल्याने स्थानिक बाजारावर दबाव आला आहे. तसेच वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्या असून देशांतर इक्विटी बाजारात सकारात्मक संकेतामुळे चलनात घसरण थांबली आहे.

आज बाजारात रुपया ८५.३१ वर सुरू झाला आणि वेगाने ८५.३५ खालच्या स्तरावर पोचला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैसे घसरुन ८५.२७ वर आला होता. यापूर्वी दोन कारोबारी सत्रात १३ पैशाची घसरण झाली होती. (Dollar)

दरम्यान सहा मुद्रांच्या तुलनेत डॉलर मजबूत होण्याऱ्या मापणात डॉलर सूचकांक ०.०४ प्रतिशत वाढून १०७.९३ वर कारभार करत होता. त्याचबरोबर अमेरिकी ट्रेजरीत प्राप्ती वाढत असून १० वर्षीय बाँड ४.५० प्रतिशतच्या आसपास होता. वैश्विक तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा कारभारामध्ये ०.०७ प्रतिशत वाढून ७३.३१ डॉर प्रति बॅरेल पर पोचला आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00