Home » Blog » प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, प्रशांत परिचारक यांना धक्का

प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, प्रशांत परिचारक यांना धक्का

भाजपची विधानपरिषदेची ११ उमेदवारांची यादी जाहीर

by प्रतिनिधी
0 comments

नवी दिल्लीः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली अकरा जणांची यादी जाहीर केली असून प्राजक्त तनपुरे, राजेंद्र राऊत यांच्यासह सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांचा यादीत समावेश आहे. सांगली-सातारा मतदारसंघातून साता-याच्या धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूरमधून प्रशांत परिचारक यांना आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. (BJP MLC Candidates list)

भाजपच्या यादीमध्ये धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांनाही वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रदेश भाजपकडून ४८नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे दिली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक झाली, त्यानंतर रात्री उशिरा या नावांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP MLC Candidates list)

भाजपची मतदारसंघ निहाय उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणेः

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी

भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर

अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील

सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम

सोलापूर – श्री राजेंद्र राऊत

अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे

छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट

नांदेड – श्री अमर राजूरकर

धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील

जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन

नागपूर – डॉ.राजीव पोतदार

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00