Home » Blog » Robert Vadra : ‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी

Robert Vadra : ‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी

ईडी कार्यालयात वड्रा हजर

by प्रतिनिधी
0 comments
Robert Vadra

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  हरियाणातील शिखोपूर जमीन व्यवहाराशी संबंधित संदर्भात चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या दुसऱ्या समन्सानंतर मंगळवारी उद्योगपती रॉबर्ट वड्रा त्यांच्या समर्थकांसह ईडी कार्यालयात हजर राहिले. राजकीय सूड उगवण्यासाठी ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप वड्रा यांनी केला. ईडीने गेल्या वीस वर्षापासून १५ वेळा चौकशीसाठी बोलावले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वड्रा हे काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती आहेत.  (Robert Vadra)

वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीने २००८ मध्ये गुडगावच्या शिकोहपूर गावात सुमारे तीन एकर जमीन साडेसात कोटी रुपयांना खरेदी केली होती. काही काळानंतर, हरियाणाच्या नगररचना विभागाने या जमिनीच्या २.७१ एकरवर व्यावसायिक वसाहत उभारण्यासाठी आशयपत्र जारी केले होते. २००८ मध्ये स्कायलाईट आणि डीएलएफ  यांच्यात झालेल्या करारानुसार तीन एकर जमीन डीएलएफला ५८ कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. जमिनीचा विक्री करार डीएलएफच्या नावे नोंदवण्यात आला होता. (Robert Vadra)

५६ वर्षीय रॉबर्ट वड्रा यांना या प्रकरणात आठ एप्रिल रोजी पहिल्यांदा समन्स बजावण्यात आले होते परंतु त्यांनी हजेरी लावली नाही. त्यानंतर ते आज मंगळवारी ईडी कार्यालयात हजर झाले.  सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी ईडीसमोर हजर झाल्यानंतर, एजन्सी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांचे म्हणणे नोंदवेल , असे वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. वाड्रा यांची यापूर्वी एका वेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात संघीय तपास संस्थेने चौकशी केली होती. (Robert Vadra)

ईडीने केलेल्या कारवाईचे खंडन करताना रॉबर्ट वड्रा म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी लोकांसाठी बोलतो तेव्हा ते मला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. हे एक राजकीय षढयंत्र आहे.  ते तपास यंत्रणांच्या अधिकाराचा गैरवापर करतात. मला कशाचीही भीती नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही.” (Robert Vadra)

रॉबर्ट वड्रा म्हणाले,  जेव्हा मी देशाच्या बाजूने बोलतो तेव्हा मला थांबवले जाते.  राहुल गांधींना संसदेत बोलण्यापासून रोखले जाते. भाजप ते करत आहे. हा राजकीय सूड आहे. लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मी राजकारणात यावे असे त्यांना वाटते. जेव्हा मी राजकारणात येण्याची तयारी व्यक्त करतो तेव्हा ते मला खाली खेचण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून दूर करण्यासाठी जुने मुद्दे उपस्थित करतात. या प्रकरणात काहीही नाही. गेल्या २० वर्षांपासून मला १५ वेळा बोलावण्यात आले आहे आणि प्रत्येक वेळी १० तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली आहे. २३००० कागदपत्रे व्यवस्थित करणे सोपे नाही,  असे ते म्हणाले. (Robert Vadra)

हेही वाचा :

भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला

दलित सरसंघचालक कधी करणार?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00