Home » Blog » महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

३१ मंत्र्यांना बंगले, फ्लॅटचे वाटप

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Cabinet file photo

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. आज (दि.२३) ३१ मंत्र्यांच्या दालनाचे आणि निवासस्थानाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक हा बंगला तर, धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला मिळाला आहे. विधान परिषदेचे नूतन सभापती, राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला मिळाली आहे.

महायुतीच्या ३१ मंत्र्यांच्या निवास स्थानाचे वाटप करण्यात आले असून अनेकांची फ्लॅटमध्ये वर्णी लावण्यात आली आहे. मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्यांची निवासस्थाने तीच ठेवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे- पाटील यांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडें यांना पर्णकुटी, शंभूराज देसाईं यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना पावनगड बंगला देण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ (क-८) विशाळगड, गिरीश महाजन-सेवासदन, गुलाबराव पाटील-जेतवन, गणेश नाईक ब-४ पावनगड, दादा भुसे ब-३ जंजीरा, संजय राठोड- शिवनेरी, मंगलप्रभात लोढा ब-५ विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल- चित्रकूट, पंकजा मुंडे- पर्णकुटी, अतुल सावे अ-३ शिवगढ़, अशोक उईके अ-९ लोहगड, शंभूराजे देसाई- मेघदूत, आशिष शेलार व-२ रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00