मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल उद्या सोमवारी ५ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मंगळवारी (दि.६) महाविद्यालयात गुणपत्रके देण्यात येणार आहेत. (HSC result)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ३३७३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. (HSC result)
या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल
१) https://results.digilocker.gov.in २) https://mahahsscboard.in
३) http://hscresult.mkcl.org ४) https://results.targetpublications.org
५) https://results.navneet.com ६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results ८) https://www.indiatoday.in/education-today/results
९) https://www.aajtak.in/education/board-exam-results