मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत काय घडले आणि शहा यांनी एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिले ते मला माहीत आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. (Raut criticizes Mahayuti)
राऊत यांनी महायुती सरकारच्या कारभारावर मंगळवारी जोरदार टीका केली. शिंदेंना शहा यांनी काय उत्तर दिले ते लोकांसमोर आले तर मला वाटते की या राज्याचे चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
राज्यातील ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्या मतांची किंमत आता पाचशे रुपयांवर आली आहे. उद्या ती शून्यावर येईल, असे भाकीतही राऊत यांनी केले. (Raut criticizes Mahayuti)
राज्य आर्थिक अराजकतेच्या खाईत
राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची टीका करून संजय राऊत म्हणाले, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना कराव्यात, पण हे राज्य चालवणे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. गेल्या साडेतीन वर्षांत राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. आर्थिक अराजकाच्या खाईत राज्य सापडलेलं आहे. अजित पवार हे बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेनं ग्रासलेले आहे. (Raut criticizes Mahayuti)
अमित शहा यांच्याकडे शिंदे यांनी अजित पवार आमच्या फाईल मंजूर करत नाहीत आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्नच आहे. तुमचे जे ५-२५ गद्दार आमदार आहेत. ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत बरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? शहांनी यावर शिंदे यांना काय उत्तर दिले, ते मला माहिती आहे. ते लोकांसमोर आले तर या राज्याचे चित्र स्पष्ट होईल, असे खासदार राऊत म्हणाले.
कुडाळची घटना बीडपेक्षाही भयंकर
कुडाळमध्ये घडलेली घटना बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आहे. आम्ही त्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ खून झाले आहेत. त्यात नऊ खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत. यांचा आका कोण आहे? या विषयी वैभव नाईक यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याचे उत्तर गृहमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
हेही वाचा :
भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला
पाच लुटेरे…
मान्सूनची गुड न्यूज!