Home » Blog » Rape in bus: पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

Rape in bus: पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

ओळख पटलेल्या संशयिताचा शोध सुरू

by प्रतिनिधी
0 comments
Rape in bus

पुणे : प्रतिनिधी : पुण्यात नोकरी करणाऱ्या युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरून गेले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयिताची ओळख पटली आहे. दत्तात्रय रामदास गाडे (रा. शिरुर) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी गृहखात्यावर टीकेचे झोड उठवली आहे. (Rape in bus)

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घटनेची माहिती दिली. पीडित युवती पुण्यात नोकरी करते. ती एसटीने सातारा जिल्ह्यातील गावी जाणार होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ती बसस्टँडवर आली. सीसीटीव्हीमध्ये संशयित तिच्याशी बोलताना दिसला आहे. त्यावेळी त्यांच्याशेजारी बसलेली एक व्यक्ती तिथून निघून गेली. संशयिताने गोड बोलून युवतीची ओळख करुन घेतली. त्यानंतर कुठे जाणार, असे तिला विचारले. संबंधित युवतीने गावाचे नाव सांगितले. त्याने ही बस येथे लागत नाही दुसरीकडे लागते असे सांगितले. मी तुला बसजवळ घेऊन जातो असे सांगितले. मुलगी संशयितासह बसजवळ जात असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे असे स्मार्तना पाटील यांनी सांगितले. (Rape in bus)

स्मार्तना पाटील यांनी सांगितले की “बसमध्ये अंधार होता. ती संशयिताला म्हणाली की बसमध्ये अंधार आहे. त्यावेळी संशयित म्हणाला ही बस रात्री आली आहे. प्रवासी झोपले असतील म्हणून टॉर्च पाडून चेक कर असे सांगितले. युवती बसमध्ये जाताच पाठीमागून आलेल्या संशयिताने बसचा दरवाजा आतून लॉक केला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संशयित बसमधून उत्तरून गेला. (Rape in bus)

त्यानंतर मुलगी बसमधून उतरली. तिने घडलेला प्रकार मित्राला सांगितला. त्यानंतर पीडित युवती आणि तिचा मित्र पोलीस ठाण्यात आले. तिच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर घडलेला प्रसंग दिसून आला. सीसीटीव्हीवर संशयिताची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. संशयित दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वी शिरुर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंग आणि चोरीचे गुन्हे नोंद आहेत. (Rape in bus)

या घटनेचा निषेध करत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बस स्टँडला भेट देऊन पोलिसांकडून माहिती घेतली. विरोधकांनी या घटनेनंतर राज्य सरकार आणि गृहखात्यावर टीकेची झोड उठवली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00