Home » Blog » Raj-CM visit: हत्ती, कबुतरं बस्स, आता ट्रॅफिकवर बोलू; राज ठाकरे

Raj-CM visit: हत्ती, कबुतरं बस्स, आता ट्रॅफिकवर बोलू; राज ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
Raj-CM visit

मुंबई : आपण कबुतर, हत्ती या विषयात अडकलोय पण पार्किंग सारख्या प्रश्नांकडे आपण पाहत नाही आहोत. वाहतूक कोंडी ही सगळ्यात गंभीर समस्या आहे, या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वाहतूक कोंडीवर काही उपाययोजनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सूचविल्या. (Raj-CM visit)

गुरुवारी (२१ ऑगस्ट) झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये सांगितला आहे.

मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विषय होता मुंबईसह राज्यातील सर्व शहरांत उदभवलेली ट्रॅफिकची समस्या आणि त्यावर आम्ही सुचवलेल्या काही उपाययोजना. शहरं वाढत आहेत, नवनवीन प्रकल्प येत आहेत, शहरांत येणाऱ्या माणसांचे लोंढे थांबत नाहीयेत. त्यात पुन्हा गाड्यांची संख्या वाढत आहे, पण आपल्याकडे ना पुरेसे रस्ते आहेत ना पार्किंग. आपण कबुतर, हत्ती या विषयात अडकलोय पण पार्किंग सारख्या प्रश्नांकडे आपण पाहत नाही आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. (Raj-CM visit)

वाहतूक कोंडी ही सगळ्यात गंभीर समस्या आहे, या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, आणि त्यावर दीर्घकालीन उपाय व्हायला हवेत. ते काय असावेत? यांत लोकसहभाग पण गरजेचा आहे. पण लोकांनीच जर ट्रॅफिकचे, पार्किंगचे नियम तोडले तर काय? कडक कारवाई व्हायलाच हवी. या सगळ्यावर आम्ही सरकारला काही सूचना केल्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. (Raj-CM visit)

दरम्यान, राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समजताच सर्वांचीच उत्सुकता ताणली होती. बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच झाली. त्यातील २१ पैकी एकही जागा जिंकता ठाकरे बंधूंना (राज आणि उद्धव) जिंकता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने उत्सुकता निर्माण झाली होती. तथापि, राज ठाकरे यांनीच ‘एक्स’वर पोस्ट करीत भेटीमागची उत्सुकता संपवली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00