बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीतील सिव्हिल लाईन्स भागात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या घरावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सुमारे सात राउंड गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित टोळी, गोल्डी ब्रार गटाने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. शुक्रवारी ही घटना घडली. (Shot fire at Disha Patani’s house)
दिशाची बहीण खुशबू पटनी (३४), भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आणि सध्या वेलनेस कोच आहे. तिनेअलीकडे केलेल्या वादग्रस्त विधानाशी या हल्ल्याचा संबंध जोडला जात आहे. तिने प्रसिद्ध कथा वाचक अनिरुद्ध आचार्य यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी महिलांविरुद्ध “स्त्रीद्वेषी टिप्पणी” केली होती, असा आरोप केला होता.(Shot fire at Disha Patani’s house)
खुशबूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओ पोस्ट केला होता. “जर तो माझ्यासमोर असता तर मी त्याला धडा शिकवला असता,” असा इशारा तिने दिला होता.
गोल्डी ब्रार गटाने सोशल मीडियावर गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.(Shot fire at Disha Patani’s house)
तथापि, तिच्या वक्तव्याचा संबंध प्रेमानंद जी महाराज यांच्याशी जोडण्यात आला. खुशबूच्या वक्तव्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर तिने टीका थांबली नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा ऑगस्टमध्ये दिला होता. तथापी, तिचे वक्तव्य प्रेमानंद जी यांच्यासाठी नव्हते, असे तिने स्पष्ट केले होते.
‘‘शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास, दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या घरावर बेछूट गोळीबार केला. कुटुंबाने दुपारी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर आम्ही गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) सह पाच विशेष पथके तैनात केली,’’ असे एसएसपी अनुराग आर्य यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
दिशाची मोठी बहीण खुशबू, भाऊ सूर्यांश आणि पालक जगदीश सिंग पटनी आणि पद्मा पटनी सिव्हिल लाईन्समधील घरात राहतात. “दिशाचे वडील, निवृत्त सर्कल ऑफिसर जगदीश सिंग पटनी यांनी तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे,” असे आर्य यांनी सांगितले. या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी गोल्डी ब्रार गटाने स्वीकारली आहे. फेसबुक पोस्टमध्ये, टोळीतील सदस्य वीरेंद्र चरणने पटनीच्या कुटुंबाला धमकी दिली आहे.