Home » Blog » पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

by प्रतिनिधी
0 comments
PM Modi

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेत दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज (दि.२२) पंतप्रधान मोदी यांना अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याकडून ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. (PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुवेतमध्ये ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि कुवेतचे अमीर शेख यांच्यात द्वीपक्षीय बैठक पार पडली.

भारत-कुवेतचे ऐतिहासिक संबंध

भारत आणि कुवेत यांचे ऐतिहासिक संबंध असून दोन्ही देशांमधील संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले आहेत. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देश अनेक काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00