प्रयागराज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रयागराज महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीत स्नान केले. भगवा टी शर्ट परिधान केलेल्या मोदींनी सूर्यदेवतेला अर्ध्य दिले. (PM holy bath)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी गंगेत स्नान केल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांचा हा पूर्वनियोजित दौरा होता.
१४ जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. कोट्यवधींनी लोकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला आहे. देश-विदेशातील भाविकांनी स्नान केले आहे. या महिन्यातील माघ अमावस्येला पवित्र स्नानाची सांगता होणार आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने बमरौली विमानतळावर उतरले. त्यानंतर ते वाहनाने महाकुंभनगरीत पोहोचले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. (PM holy bath)
व्हीआयपीसाठी तयार करण्यात आलेल्या अरैल घाटावर पंतप्रधान मोदींनी गंगेत डुबकी मारुन पवित्र स्नान केले होते. त्यांनी भगवा टी शर्ट घातला होता तर गळ्यात निळ्या रंगाची मफलर गुंडाळली होती. रुद्रांशाच्या माळा परिधान केल्या होत्या. स्नान केल्यानंतर त्यांनी सूर्यदेवतेला अर्ध्य दिले. तसेच त्यांनी ध्यानही केले. यावेळी परिसरात चारही बाजूला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.
गंगेतील स्नानानंतर त्यांनी काळा कुर्ता परिधान केला होता. गळ्यात केशरी रंगाचे उपरणे होते. डोक्यावर त्यांनी हिमाचलची टोपी घातली होती. त्यानंतर त्यांनी परत कलशातून सूर्याला गंगाजल अर्पण केले. तसेच मोठ्या कलशातून गंगेला दूधही अर्पण केले. त्यानंतर गंगेची पूजा आणि प्रार्थना केली. सर्वात शेवटी हातात गंगेचे पाणी घेऊन मंत्रोपच्चार केले. (PM holy bath)
महाकुंभात स्नान करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीबरोबर अनेक व्हिआयीपींनी स्नान केले आहे. त्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनकड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, उद्योगपती गौतम अदानी, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, मंत्र्यांनी गंगेत डुबकी मारली आहे. दहा फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही पवित्र स्नान करणार आहेत.
Blessed to be at the Maha Kumbh in Prayagraj. The Snan at the Sangam is a moment of divine connection, and like the crores of others who have taken part in it, I was also filled with a spirit of devotion.
May Maa Ganga bless all with peace, wisdom, good health and harmony. pic.twitter.com/ImeWXGsmQ3
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2025
हेही वाचा :