Home » Blog » Pawar’s googly : पवार साहेब गुगुली टाकत आहेत : हसन मुश्रीफ

Pawar’s googly : पवार साहेब गुगुली टाकत आहेत : हसन मुश्रीफ

by प्रतिनिधी
0 comments
Pawar's googly

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूकीत भेटायला आलेल्या दोघांनी १६० जागांवर विजय मिळवून देतो असे सांगून खळबळ माजवणाऱ्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘पवार साहेब गुगुली टाकत आहेत’, अशा शब्दात खिल्ली उडवली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणापासून स्थानिक राजकारणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. (Pawar’s googly)

 शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ  म्हणाले, पवार साहेबांच्या वक्तव्याबद्दल मला खरोखरच आश्चर्य वाटते. त्या व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नंबर तरी पवार साहेबांनी लिहून ठेवले असतील. त्यांना विचारायला हवे होते की, हे कसे करून देणार आहात? विधानसभा निवडणूक होऊन आजघडीला नऊ महिने होऊन गेले आणि पवारसाहेब ही गुगली आता टाकत आहेत.  आज संजय राऊतही म्हणत आहेत, की असे लोक येऊन गेले. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल. (Pawar’s googly)

निवडणूक आयोगानेच मतचोरी केल्याची तक्रार अनेक दिवसापासून राहुल गांधी मांडत आहेत. या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, या संदर्भात निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मुद्यांचे खंडन केले आहे. वास्तविक;  पराभव हा पराभव असतो. तो पचवायचीही ताकद लागते. निवडणुकांमध्ये कच्च्या मतदाराच्या लोकांसमोर येत असतात. त्यावर हरकतीही मागवल्या जात असतात. कोल्हापूर जिल्ह्यात एकही उमेदवार असे झालेले आहे, असं म्हणायला  तयार नाही. राहुल गांधी या मुद्द्यावरून विनाकारण निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत. देशाचा वेळ घेत आहेत आणि संसदेचाही वेळ घेता आहेत. यामधून काहीही साध्य होणार नाही. मला वाटतं की, बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा काहीतरी प्लॅन असू शकतो. (Pawar’s googly)

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असा आरोप करीत आज राज्यभर मोर्चे काढलेले आहेत. या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, जे आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय त्यासाठी आहे. आरोप सिद्ध न होता कारवाई कशी होईल, असा सवाल करतानाच मंत्री. मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षांचे कामच आहे की वातावरण सतत असं ढवळणे आणि सत्तारूढ पक्षावर टीका करीत राहणे असते.

        चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. परंतु;  महापौर भाजपचाच असेल.’ या वक्तव्यावर विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले,  मी यापूर्वीही असे म्हटलो आहे की, आम्ही महायुती म्हणून सगळे एकत्र लढू.  एकत्र होणार नाही तिथे वेगवेगळे लढू.  महापौर पद आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीकडेच राहील आणि जास्तीत-जास्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणारच आहोत.

         शक्तिपीठ करायचा आहे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांनी ती कधी दडवूनही ठेवलेली नाही.  परंतु; शक्तिपीठ हा कोणावरही लादायचा नाही, हीच त्यांची भूमिका आहे, असे मुश्रीफांनी सांगिलेत.  आम्हा लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ रस्ता करणार नाहीत. त्यांनी आम्हाला अनेक मार्ग सुचविलेले आहेत.  त्यापैकी जो मार्ग चांगला असेल. कमीत कमी बागायती जमीन जाईल व  जिथे शेतकरी समाधान असेल त्या ठिकाणाहून शक्तीपीठ रस्ता नेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे.

       शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे, या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. या विषयातील त्यांचे ज्ञान प्रगल्भ झाले आहे,  हे मला काय माहित नव्हतं. असं कधी होत नसतं.  रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो कॉंक्रिटीकरणाचा की कसा? यावर त्याचे दर ठरत असतात. मला वाटतय, हा त्यांचा गोड गैरसमज असावा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00