बेंगळुरू: आयुष्मान भारत योजनेचा लाभ न मिळाल्याने बेंगळुरूमधील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपले जीवन संपवले. हॉस्पिटल प्रशासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास नकार दिल्याने ती व्यक्ती तणावात होती, अशी माहिती पुढे आली आहे. (Patient Suicide)
टाइम्स ऑफ इंडिया आणि लल्लनटॉप डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कॅन्सरचे निदान झाल्याने संबंधित व्यक्तीचे कुटुंब तणावात होते. त्यांना हॉस्पिटलने आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाख रुपयांचा कव्हर देण्यासही नकार देण्यात आला. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. त्यांनी आयुष्यमान भारत योजनेत नोंदणीही केली होती.(Patient Suicide)
कॅन्सर पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने आयुष्मान भारत योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड बनवले होते. या योजनेअंतर्गत रुग्णाला पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार होता, पण किदवई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीने कुटुंबाचा दावा अमान्य करताना राज्य सरकारचा आम्हाला अजूनही आदेश आला नसल्याचे सांगितले. हॉस्पिटलने ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता.(Patient Suicide)
‘केएमआयओ’चे प्रभारी संचालक डॉ. रवी अर्जुन यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना अजून सुरू झालेली नाही. आम्ही सरकारच्या आदेशाची वाट पहात आहोत. या योजनेची अजून अंमलबजावणी सुरू नसल्याचे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे. या योजनेतील रुग्णांना लाभ कसा द्यायचा याची माहितीही मागितली आहे. या योजनेंतर्गत ७० वर्षे आणि त्यावरील व्यक्तींना पाच लाख रुपयांचा मुक्त विमा कव्हरेज दिला जातो.
रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मतानुसार, सुरुवातीला स्कॅनिंगसाठी आमचे वीस हजार रुपये खर्च झाले. पुढील उपचारासाठी ‘केमो’ची गरज होती. केएमआयओने केमोथेरेपीचे नियोजन केले होते. आम्ही उपचाराचा खर्च देण्याची तयारी केली होती. पण आमच्या रुग्णाने त्यापूर्वीच आत्महत्या केली. आमच्या रुग्णाने केलेल्या आत्महत्येचा संबंध आयुष्मान योजनेशी आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आयुष्मान योजनेखाली उपचाराचा खर्च होणार नसल्याने ते तणावात होते.
हेही वाचा :
पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!