Home » Blog » इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; शाहीन-नसीमचे पुनरागमन

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; शाहीन-नसीमचे पुनरागमन

PAK vs ENG : मुलतानमध्ये होणार मालिकेतील पहिला सामना

by प्रतिनिधी
0 comments
PAK vs ENG

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सोमवारपासून मुलतानमध्ये होणार आहे. (PAK vs ENG)

इंग्लिडविरूद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने संघात तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांचे पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघेही बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत खेळले नव्हते. इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने मुलतानमध्ये आणि तिसरा सामना रावळपिंडीत होणार आहे. (PAK vs ENG)

पाकिस्तानला घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत बांगला देशने पाकिस्तानला क्लीन स्वीप केले होते. इंग्लंडने गेल्या वेळी पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी यजमानांना 3-0 असा व्हाईटवॉश केला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सलीम अयुब, अब्दुल्ला शफीक,  बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00