एजबॅस्टन : कर्णधार शुभमन गिलने आज पुन्हा इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावत भारताला अंत्यत सुस्थितीत आणले. चहापानापूर्वीच्या ऑफ स्पिनर बशिरच्या गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने शतक झळकावले. पहिल्या डावात गिलने द्विशतक (२६९) ठोकले होते. गिलच्या त्याच्या कारकिर्दीतील आठवे शतक आहे. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ३०४ केल्या होत्या. भारताला ४८४ धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. गिल १०० धावावर तर रवींद्र जडेजा २५ धावांवर खेळत आहेत. (Gills eight century)
आज चौथ्या दिवशी के.एल. राहूल आणि करुन नायर जोडी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मैदानात उतरली. इंग्लंडचा वेगवान मारा आणि स्विंग गोलंदाजीमुळे त्यांना अडचण येत होती. कार्सच्या एका चेंडूवर राहूल चांगलाच चकला. चेंडू बॅटची कड घेऊन स्लीपमधून सीमापार केला. त्यानंतर कार्सचा एक बाउंसर करुन नायरच्या हेल्मेटवर आदळला. नायरने चेंडू टाळण्याचा प्रयत्न केला होता. पंचानी मेडिकल स्टाफला बोलावले. त्यानंतर नायर पुन्हा खेळायला आला. ब्रायडन कार्सचा एक चेंडू करुन नायरच्या बॅटला लागून स्लीपमधील हॅरी ब्रुक आणि जोड रुटच्या मधून गेला. त्यानंतर करुन नायरने दोन चौकार मारले. करुन नायर सेट झाला असे वाटत असताना ब्रायडन कार्सने त्याला चकवले. बॉलने त्याच्या करुनच्या बॅटची कड घेऊन जेमी स्मिथने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. यावेळी भारताची धावसंख्या २ बादल ९६ अशी होती. (Gills eight century)
त्यानंतर कर्णधार गिल मैदानात उतरला. दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. ब्रायडन कार्सचा एक चेंडू गिलच्या पॅडवर आदळला आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी पंचाकडे दाद मागितली. पंचानी रिव्हू घेतला असता बॉलचा बॅटला स्पर्श झाल्याचे स्पष्ट झाल्याने रिव्हू नाकाम ठरला. त्यानंतर कार्सला गलीमधून राहूलने चौकार ठोकला. त्यानंतर के.एल. राहूलने कव्हर्समधून सुरेख ड्राईव्ह मारुन चौकार ठोकत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर जोश टँगने राहूलला चकवले. चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला. राहूलने ५५ धावा केल्या. (Gills eight century)
राहूल बाद झाल्यानंतर पंतने सुरवातीपासून धडाकेबाज सुरूवात केली. त्याने एक चौकार मारला आणि एक षटकार खेचत वेगवान फलंदाजी करण्याचा इरादा दाखवून दिला. त्यानंतर स्पिनर बशीरला दोन चौकार ठोकले. त्यानंतर पंत षटकार खेचला. पण त्याची बॅट हातातून निसटली. यावेळी प्रेक्षकांची हसून पुरेवाट झाली. ड्रेसिंगरुम त्याचे सहकारी हसत होते. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने ३ बाद १७७ धावा केल्या. ऋषभ पंत ४१ तर शुभमन गिल २४ धावांवर खेळत होते. भारताने पहिल्या सत्रात दोन गडी गमावून २५ षटकात ११३ धावा केल्या. (Gills eight century)
उपाहारानंतर कर्णधार गिल आक्रम झाले. त्याने गोलंदाजांवर हल्ला चढवला. पहिल्याच षटकात जोशला एक षटकार खेचला आणि दोन चौकार मारत भारताचे द्विशतक फलकावर लावले. त्यानंतर ऋषभ पंतने अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर पंतची बॅट तळपू लागली. पण त्याचा डाव बशीरने खलास केला. पुढे येऊन बशिरला मारताना त्याच्या हातातून बॅट सुटली. बेन डकेटने लाँग ऑफवर सोपा झेल टिपला. पंतने ६५ धावा केल्या. पंतच्या मजेदार खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. त्यानंतर मैदानावर जडेजा आला. तर शुभमन गिलची शतकाकडे वाटचाल सुरू केली. तर जेडजाकडून फटकेबाजी सुरू होती.
चहापानापूर्वी सर्वांचे लक्ष गिलच्या शतकाकडे लागले होते. बशिरच्या गोलंदाजीवर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत शुभमन गिलेने शतक केले. पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात कर्णधार गिलने शतक ठोकले. कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा गिल तिसरा भारतीय कर्णधार ठरला. १९७८ मध्ये वेस्ट इंडिजविरुध्द, विराट कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात शतके झळकावली होती. (Gills eight century)