Home » Blog » प्राध्यापकांचा पगार १ तारखेला करण्याचा आदेश

प्राध्यापकांचा पगार १ तारखेला करण्याचा आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Order issued to disburse professors' salaries on the first of the month

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविदयालये तसेच अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन १ तारखेलाच जमा करण्याचे आदेश उच्च शिक्षण मंडळाने दिले आहे. यामुळे राज्यातील ६५ हजार प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा होणार आहे. (Order issued to disburse professors’ salaries on the first of the month)

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी विभागीय सहसंचालकांना आदेश दिले आहेत. अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि समाजकार्य महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांतील शिक्षक आणि शिक्षकतेर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन, अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक अनुदानाची मागणी प्रत्येक महिन्यात २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करावी लागणार आहे. ही सर्व माहिती कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीनेच सादर करावी लागणार आहे. या निर्णयामुळे शासनाच्या बीडीएस प्रणालीद्वारे वेळेत अनुदान मंजूर करणे सुलभ होणार आहे. (Order issued to disburse professors’ salaries on the first of the month)

तासिका तत्वारील प्राध्यापकांना मानधन दिल्यानंतर त्याचा एकत्रित महाविद्यालयीन तपशील दरमहा पाठवावा लागणार आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांनी विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्राध्यापकांचा पगार एक तारखेलाच झाला पाहिजे यांचे नियोजन उच्च शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय संचालकांना दिले असून राज्यात सर्वत्र अंमलबजावणी होत आहे असे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले. (Order issued to disburse professors’ salaries on the first of the month)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!