Home » Blog » राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे कोल्हापुरातील दिग्गजांच्या मुलाखती

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे कोल्हापुरातील दिग्गजांच्या मुलाखती

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे कोल्हापुरातील दिग्गजांच्या मुलाखती

by प्रतिनिधी
0 comments
NCPSP

पुणे :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज (दि.८) पुण्यात पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरसाठी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, चंदगडमधून डॉ. नंदाताई बाभुळकर-कुपेकर आणि अमरसिंह चव्हाण, राधानगरीमधून ए. वाय. पाटील, संतोष मेघाणे आणि डॉ. नवज्योतिसिंह देसाई, कागलमधून समरजितसिंहराजे घाटगे, इचलकरंजीमधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, सुहास जांभळे, संजय तेलनाडे तर शिरोळमधून स्नेहा देसाई यांच्या मुलाखती झाल्या.

यावेळी कोल्हापूरमधून कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, रामराजे कुपेकर, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवाजी माने, भुदरगड तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण, वसंतराव देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मुलाखती शरद पवार यांच्यासह पक्षाच्या संसदीय कमिटीच्या सदस्य खा. सुप्रिया सुळे, आ. बाळासाहेब पाटील, खा. अमोल कोल्हे, आ. रोहित पवार, आ.शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. फौजिया खान, माजी खासदार वंदना चव्हाण आदींच्या उपस्थितीत झाल्या.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00