गरिआबंद : १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर चालपती उर्फ अप्पा राव याचा सुरक्षादलांनी खात्मा केला. छत्तीसगडच्या गरिआबंद जिल्ह्यात सोमवारी (दि.२० जानेवारी) रात्री ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. छत्तीसगडा आणि ओरीसा पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेत १४ नक्षलवादी मारले गेले.(14 Naxalites killed)
गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या कारवाईचे स्वागत केले आहे. ‘नक्षलवादाला मोठा धक्का’ असे त्यांनी म्हटले आहे.
रविवारी रात्रीपासून ही मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान सुरू असलेली चकमक मंगळवारी सकाळी संपली. तब्बल एक हजार जवानांनी ६० नक्षलींना घेरले. त्यात कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला. छत्तीसगड तेलंगण सीमेवर छत्तीसगडच्या गरिआबंद जिल्ह्यात ही चकमक झडली. मुख्यमंत्री विष्णूदास साय यांनी या मोहिमेबद्दल जवान आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (14 Naxalites killed)
गरिआबंद जिल्ह्यातील कुल्हाडी घाटातील भालू डिग्गी जंगलात ही चकमक झडली. १४ नक्षलावाद्यांचा खात्मा करुन त्यांच्याकडील अत्याधुनिक शस्त्रेही सुरक्षा दलांनी जप्त केली. चकमकीत एक महिला नक्षलवादीही ठार झाली आहे. जखमी जवानाला एअरलिफ्ट करुन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (14 Naxalites killed)
संयुक्त मोहिमेत दहा पथके सहभागी झाली होती. त्यात ओरिसातील तीन, दोन छत्तीसगड पोलिस आणि पाच सीआरपीएफच्या तुकड्या होत्या. जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. अन्य एका वृत्तानुसार पोलिसांनी नक्षलवादी कमांडर हिडमाच्या गडात घुसून १८ नक्षलींचा एनकाऊंटर केल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये हिडमा आणि देवा निसटून गेले. शोधमोहिमेत नक्षलींचे एक बंकरही मिळून आले. जमिनीखाली आत ते दहा फूट खोल आणि १२ ते १४ फूट मोठे होते. त्यामध्ये हत्यारे, बॉम्ब तयार करण्याचे मशिन, दारुगोळा आणि वायर सापडली.
Another mighty blow to Naxalism. Our security forces achieved major success towards building a Naxal-free Bharat. The CRPF, SoG Odisha, and Chhattisgarh Police neutralised 14 Naxalites in a joint operation along the Odisha-Chhattisgarh border. With our resolve for a Naxal-free…
— Amit Shah (@AmitShah) January 21, 2025
हेही वाचा :
वडील गेले, घरातील आठ माणसे हिरावली!