कानपूर : प्रतिनिधी : सहा लाखाची सुपारी देऊन सुनेने सासऱ्याचा काटा काढल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. सुपारी किलरनी ६३ वर्षीय सासऱ्याचा खून केला. त्याच्यावर चाकूने २६ वार केले. खुनाच्यावेळी सुन आपल्या पती आणि मुलासमवेत पार्टीमध्ये नाचत होती. तिथून ती सुपारी किलरना सूचना देत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. सासऱ्याच्या खुनाची घटना कळाल्यानंतर सुन ढसाढसा रडून बेशुद्ध पडली होती. (Murder of pharmaceutical businessman Vinod Manoch)
सुरवातीपासून पोलिसांचा घरच्यावर संशय
कानपूरच्या कल्याणपूर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये शनिवारी पाच सप्टेंबर रोजी कोट्यधीश असलेले औषध व्यावसायिक विनीत मनोचा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना घरामध्ये एकही वस्तू चोरीस गेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खुनाच्या घटनेत घरातील सदस्य असावा असा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता या प्रकरणाचा पर्दापाश झाला.
पोलिसांचा शालू मनोचवर संशय बळावला
तपास करणाऱ्या महिलांनी सून शालू मनोच यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांनी शिवमला ओळखतेस का असा सवाल केला असता तिने ओळखत असल्याचे सांगून शिवमचे नाव विशाल असल्याचे सांगितले. तो किरकोळ कामांसाठी घरीत येत जात होता. पण विशालने सासऱ्यांना का मारले असा तिने प्रश्न केल्यावर पोलिसांचा शालू विनोतवर संशय बळावला. चौकशीच्यावेळी शालूच्या चेहऱ्यावर हावभाव बदलत असल्याने पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता. (Murder of pharmaceutical businessman Vinod Manoch)
हत्येच्या दिवशी सुपर किलरशी शालूचा संपर्क
विनीत मनोच यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री नोकर विशाल आणि त्याचा साथीदार राजकिशोर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शालू विनोत यांच्या सांगण्यावरुन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी शालूच्या मोबाईलवर कॉल रिपोर्ट तपासले असता चित्र स्पष्ट झाले. शालूने हत्येची सुपारी दिलेल्या विशालशी दुपारी बारा ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान १४ कॉल केले होते. तर पती सुब्रतने २५ वेळा व्हॉटस अप कॉल केले होते.
घरात सीसीटीव्ही बसवल्याने शालू मिनोच नाराज
कोट्यधीश असलेले विनीत मिनोच मुलगा आणि सुनेच्या खर्चावर नियंत्रण आणले होते. तसेच त्यांच्यावर अनेक बंधने आणली होती. १५ ते २० दिवसांपूर्वी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने शालू विनोत आपल्या खासगी आयुष्यावर हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेपही तिने नोंदवला होता. नाराज शालूने सासऱ्याचा काटा काढण्यासाठी सहा लाखाची सुपारी दिली होती. घरातील नोकर विशाल आणि त्याचा साथीदार राजकिशोर यांनी कट रचला होता. सुरवातीला उशीने तोंड दाबून हृदयविकाराच्या झटक्याने बनाव रचायचा होता. पण नंतर आरोपींनी चाकूचे वार करुन विनीत मनोच यांचा खून केला.
‘तुम तो, धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो’ गाण्यावर डान्स
हत्येच्या दिवशी शालू मिनोच पती सुब्रतो याच्यासमवेत एका पार्टीमध्ये नाचत होती. कानपूरमधील एका लाउंजमध्य नाचताना त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणणाऱ्यानुसार शालू सुपारी दिलेल्या व्यक्तीशी हॉट्स अप कॉल, मेसेज, व्हॉईस कॉलद्वारे सासऱ्या मारणाऱ्या किलरच्या संपर्कात होती आणि मार्गदर्शनही करत होती. शालूने जांभळ्या रंगाचा गाऊन घातला होता तर तिचा पती सुब्रतो याने ग्रे कलरचा शर्ट घातला होता. एका व्हिडिओमध्ये दोघे ‘तुम तो, धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. (Murder of pharmaceutical businessman Vinod Manoch)