गया : केंद्रीय मंत्री जितन राम मांझी याच्या नातीची गोळी झाडून हत्या झाली. बिहारमधील गया जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. (Murder in Gaya)
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री मांझी यांच्या नातीवर पतीने गोळी झाडून हत्या केली आहे. हत्येनंतर पती फरार झाला आहे. मांझी यांची नात सुषमा देवी बिहारच्या तेटुवा गावात बहिण पूनम कुमारी आणि मुलांसमवेत रहात होत्या. सुषमा आणि त्यांची बहिण पूनम यांची शेजारीशेजारी घरे आहेत. त्यांचे पती रमेश हे पाटणा येथे ट्रक ड्रायव्हर म्हणुन काम करत होते. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते काम संपवून घरी आले. त्यानंतर रमेश आणि सुषमा यांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी चिडलेल्या रमेश यांनी देशी कट्टा काढला आणि सुषमा यांच्यावर गोळी झाडली. सुषमा देवी यांची मुले आणि बहिण धावत आली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. पोलिसांनी सुषमा यांचा पती रमेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. सुषमा देवी आणि रमेश यांचा १४ वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता अशी माहिती पुढे आली आहे. (Murder in Gaya)
गयाचे एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नीमचक बथानीचे एसडीपीओ प्रकाश कुमार आणि एसएसपी अन्वर जावेद यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार केली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि तज्ज्ञांना पाठवण्यात आले आहे.(Murder in Gaya)
हेही वाचा :