इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका युवकाने आपल्या आईचे दुसऱ्यांदा लग्न लावून देण्यात पुढाकार घेतला. १८ वर्षानंतर आईला जीवनसाथी मिळवून देण्यात त्याने मदत केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली. त्याच्या या निर्णयाबद्दल समाजमाध्यमातून कौतुकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (mother’s remarriage)
पाकिस्तानात महिलाबद्दल नकारात्मक बातम्या येतात, पण येथील एका युवकाने असे एक काम केले आहे की त्याचे कौतुक होत आहे. अब्दुल फहदने आपल्या आईचे दुसऱ्यांदा लग्न लावून दिले. तिच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू करण्यास मदत केली. सोशल मीडियावर या युवकाच्या पोस्टवर खूप चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत. त्याच्या निर्णयाबद्दल कौतुक होत आहे. अब्दुल फहदने इन्सटाग्रामवर एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये आपल्या आईबद्दल हृदयस्पर्शी प्रसंग सांगितले आहेत. (mother’s remarriage)
अब्दुलने आईच्या दुसऱ्या विवाहाच्या माहितीविषयी व्हिडिओ पोस्ट केला आहे. अब्दुल म्हणतो की, ‘आईला एक खास जीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आमच्या आईने संपूर्ण जीवन आमच्यासाठी समर्पित केले आहे. पण तिला एक समाधानी आयुष्य जगण्याचाही हक्क आहे. मुलगा म्हणून मी एक चांगले काम केले आहे.’ (mother’s remarriage)
तो म्हणतो ‘१८ वर्षानंतर आईला प्रेम आणि जीवन जगण्याची दुसरी संधी मिळवून दिली आहे’. व्हिडिओत अब्दुलने आपल्या आईसमवेत सुंदर क्षणाचे प्रसंग प्रदर्शित केले आहेत. आईच्या निकाहावेळी तो उपस्थित होता. त्याचा परिवार आणि मित्रही सहभागी झाले होते.
अब्दुलने दुसऱ्या पोस्टमध्ये आईच्या दुसऱ्या विवाहाचा फोटो शेअर करताना हृदयस्पर्शी संदेश शेअर केला आहे. या संदेशात अब्दुल म्हणतो की, माझ्या आईचे दुसरे लग्न झाले हे सांगण्यास मला संकोच वाटत होता. त्यामुळे ही माहिती देण्यास वेळ लागला. पण माझ्या निर्णयाबद्दल सर्वांनी जे प्रेम आणि समर्थन दिले त्यामुळे मी गदगदून गेलो आहे. आईला मी सांगितले की, लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. माझ्या निर्णयाचा सन्मान केला आहे. आम्ही दोघेही तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी प्रत्येक मेसेज, कमेंटला उत्तर देऊ शकलो नाही, तरी आपल्या सर्वांच्या पोस्ट आमच्यादृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत.
हेही वाचा :