हिस्सार : तुम्ही मुस्लिमांचे नेहमी लांगूलचालन करता. मग आतापर्यंत काँग्रेसचा अध्यक्ष मुस्लिम समाजातील व्यक्तीला का केले नाही, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. (Modi slams Congress)
हरियाणातील हिस्सार येथे आयोजित कार्यक्रमावेळी मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
काँग्रेसच्या कूटनीतीचे सर्वांत मोठे उदाहरण वक्फ कायदा आहे. आता नव्या तरतुदींमुळे वक्फची पवित्र भावना जपली जाईल. काँग्रेसने वाटते तर त्यांनी मुस्लिमांना संसदेत ५० टक्के उमेदवारी द्यावी. ते जिंकून आले तर त्यांचे म्हणणे मांडतील, पण काँग्रेसला हे करायचे नाही, असा आरोप करत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. (Modi slams Congress)
काँग्रेसने कुणाचे भले केले नाही
काँग्रेसने कुणाचे भले केले नाही, कुणाचे भले व्हावे, असेही त्यांना वाटले नाही. मुस्लिमांचेही भले करावे असे काँग्रेसला कधीच वाटलेले नाही. काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीय लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर समाज हालअपेष्टाच सहन करत राहिला. अशिक्षित आणि गरीब राहिला, असे पंतप्रधान म्हणाले. (Modi slams Congress)
बाबासाहेबांचा काँग्रेसकडून सातत्याने अवमान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने सातत्याने अवमान केला, याचा पुनरूच्चार मोदी यांनी केला. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांचे स्वप्न सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले होते. सामाजिक न्यायाचे तत्त्व त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून अंमलात आणले. काँग्रेसने संविधानातील तरतुदींना लांगूलचालणाचं माध्यम बनवजं. सत्ता लुटण्याचं हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. काँग्रेसची सत्ता संकटात येईल तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवले. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावले, असा आरोपही मोदी यांनी केला. (Modi slams Congress)
एससी, एसटींना दुय्यम मानले
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले. काँग्रेस नेते स्विमिंग पूलसारख्या सुविधांचा आनंद घेत होते. मात्र, खेड्यातील लोक पाण्याअभावी व्याकुळ होत होते. शंभर घरांमागे केवळ १६ घरांनाच पाईपने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे सर्वाधिक नुकसान एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीयांचे झाले. आज जे गल्लोगल्ली भाषणे देत फिरत आहेत. त्यांनी किमान आपल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय बांधवांच्या घरी पाणी तरी पोहोचवायला हवे होते.’