Home » Blog » Modi Japan Visit: जपानच्या पंतप्रधानांसोबत मोदींचा बुलेट ट्रेन प्रवास

Modi Japan Visit: जपानच्या पंतप्रधानांसोबत मोदींचा बुलेट ट्रेन प्रवास

by प्रतिनिधी
0 comments
Modi Japan Visit

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत बुलेट ट्रेनचा प्रवास केला. सध्या ईस्ट जपान रेल्वे कंपनीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय रेल्वे चालकांचीही त्यांनी भेट घेतली. (Modi Japan Visit)

शिगेरू इशिबा यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर प्रवासाचे फोटो शेअर केले आणि म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींसोबत सेंदाईकडे. मी तुमच्यासोबत गाडीत असेन. (Modi Japan Visit)

शनिवारी मोदींचे स्वागत करण्यासाठी जेआर ईस्टसह जपानमध्ये प्रशिक्षण घेत असलेले अनेक भारतीय रेल्वे चालक उपस्थित होते. मोदी यांनी या चालकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले.

शनिवारी, मोदींनी टोकियोमध्ये जपानच्या गव्हर्नरांची भेट घेतली. संवादादरम्यान, मोदींनी “परस्पर सहकार्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला आणि या संदर्भात सामायिक प्रगतीसाठी १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू केलेल्या राज्य-प्रीफेक्चर पार्टनरशिप इनिशिएटिव्ह अंतर्गत कृती करण्याचे आवाहन केले,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (Modi Japan Visit)

बैठकीचे फोटो शेअर करताना मोदी यांनी म्हटले, “राज्य-प्रादेशिक सहकार्य हा भारत-जपान मैत्रीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. म्हणूनच काल १५ व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत यावर एक वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला.”

‘‘व्यापार, नवोन्मेष, उद्योजकता आणि इतर क्षेत्रात सहकार्य करण्यास प्रचंड वाव आहे. स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि एआय सारखे भविष्यकालीन क्षेत्र देखील फायदेशीर ठरू शकतात,’’ असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00