लखनौ : उत्तर प्रदेशच्या मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. पक्षाचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी ६१ हजाराहून अधिक मतांनी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांना धूळ चारली.(Milkipur bypoll)
दिल्ली आणि मिल्कीपूरमधील विजयाने खोट्या आणि लुटारू वृत्तीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. दिल्लीतील विजयी उमेदवार, दिल्लीची जनता आणि भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना माझ्या शुभेच्छा. आता आपल्या राजधानी दिल्लीत विकास आणि सुशासनाचे राज्य सुरू होईल.
‘सपा’चे खोटारडे राजकारण : मुख्यमंत्री योगी
गेल्या दोन दशकात दिल्ली खूपच मागे पडली होती. सर्वसामान्य जनतेला किमान सुविधाही मिळत नव्हत्या. यमुना किनारी वसलेल्या दिल्लीचा आता खऱ्या अर्थाने विकास होईल. मिल्कीपुरात समाजवादी पक्षाचे हुकूमशाहीवादी आणि खोटारड्या राजकारणाचा पराभव झाला आहे, अशी टीकाही योगी यांनी केली. (Milkipur bypoll)
हेही वाचा :
दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय
अमेरिकेच्या निर्बंधांचा ‘आयसीसी’कडून निषेध