रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. त्यामध्ये ३१ माओवादी ठार झाले आहेत. या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. अजुनही माओवाद्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक सुरू असल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. या घटनेत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. (Maoist killed)
बिजापूरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक तुकडी माओवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील घनदाट जंगलात ही चकमक झाली. माओवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षारक्षाकांनीही गोळीबाराने चोख प्रत्युत्तर दिले. माओवाद्यांना घेरले. (Maoist killed)
प्राथमिक माहितीनुसार, या चकमकीत १२ माओवादी ठार झाले आहेत, असे ते म्हणाले. परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. घटनास्थळावरून अधिक माहिती घेण्यात येत आहे. परिस्थिती तणावपूर्ण आहे. अधिकारी हाय अलर्टवर आहेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी चकमकीत मारले गेलेले जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि विशेष कार्य दल (एसटीएफ) – माओवादविरोधी कारवायांमध्ये तज्ज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलाचे होते. या घटनेत इतर दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रायपूरला हेलिकॉप्टरने नेण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Maoist killed)
पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रविवारी अधूनमधून गोळीबाराच्या घटना घडल्या. अद्याप चकमक सुरू आहे. गोळीबारात आणखी काही नक्षलवादी मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे. आमचे शोधकार्य सुरू आहे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात या वर्षी घडलेली ही दुसरी चकमक आहे. १२ जानेवारी रोजी येथे झडलेल्या चकमकीत तीन माओवाद्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. (Maoist killed)
अबुझमाडला लागून असलेला राष्ट्रीय उद्यान परिसर माओवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. २,७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्र सीमेला लागून आहे. १९८३ मध्ये ते व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा :
बेळगावच्या चार भाविकांवर घाला
बनावट एन्काउंटर खटला सुरूच राहणार