आग्रा : मुंबईत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस(टीसीएस)मध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मानव शर्मा (वय ३०) असे त्याचे नाव आहे. पत्नी निकिता हिच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने गळफास घेण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डमध्ये म्हटले आहे.(Manager’s Suicide)
गळफास घेण्यापूर्वी त्याने ६ मिनिटे आणि ५७ सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात त्याने वैवाहिक जीवनातील दुःख व्यक्त केले होते. तसेच त्याने पालकांची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे ‘कृपया, कोणीतरी पुरुषांबद्दल बोलले पाहिजे. ते खूप एकटे पडतात,’ असा उल्लेख त्याने आवर्जून केला आहे.(Manager’s Suicide)
मानवचे कुटुंबीय डिफेन्स कॉलनीत राहते. तो मुंबईत कामाला होता. त्याचे वडील, निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत. नरेंद्र शर्मा असे त्यांचे नाव आहे. त्यांनी सांगितले की मानवचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. सुरूवातीचे दिवस खूप चांगले गेले. मात्र त्याच्या पत्नीने खोटे आरोप सुरू केले. तसेच तिने तिच्या प्रियकरसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा साहजिकच वाद झडू लागले.
२३ फेब्रुवारीला मानव आणि त्याची पत्नी मुंबईहून परतले. जेव्हा त्याने तिला तिच्या माहेरी सोडले तेव्हा तिला तिच्या कुटुंबियांनी धमकावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतःचा जीव घेतला.(Manager’s Suicide)
भावनिक व्हिडिओ असूनही सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार आली नाही. तथापि, गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
पत्नीने सर्व आरोप फेटाळले
दरम्यान, मानवची पत्नी निकिता शर्मा हिने सर्व आरोप फेटाळून लावले. मानव दारूच्या आहारी गेला होता. त्याने यापूर्वीही अनेकदा स्वत:ला इजा करून घेतली होती, असे तिने सांगितले.
“तो अतिरिक्त मद्यपान करत असे. त्याने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मी त्याला अनेक वेळा वाचवले. दारू पिऊन त्याने मला मारहाणही केली. मी माझ्या सासरच्या मंडळींना अनेकदा कळवले होते, पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. हा पती-पत्नीचा विषय आहे आणि ते त्यात फार काही करू शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते, असे निकिता सांगितले. (Manager’s Suicide)
निकिताने सांगितले, ‘‘त्या दिवशी, मी मानवच्या पालकांशी संपर्क साधला. तो टोकाचे पाऊल उचलू शकतो, असे मी त्यांना सांगिले. त्याच्या बहिणीलाही याची माहिती दिली होती.’’
कोण होते मानव शर्मा?
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, मानव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये एक वरिष्ठ प्रक्रिया सहयोगी होता आणि त्याने यापूर्वी विविध संस्थांमध्ये टॅलेंट ॲक्विझिशन स्पेशलिस्ट म्हणून काम केले होते. ते चंदीगड येथील डीएव्ही कॉलेजचे पदवीधर होते.
हेही वाचा :
बद्रीनाथजवळ हिमस्खलन; ४२ कामगार अडकले
दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकल्या