Home » Blog » Maharashtra Kesari पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’

Maharashtra Kesari पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’

सोलापूरचा महेंद्र गायकवाडला ठरला उपविजेता

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Kesari

अहिल्यानगर : अतिशय अटीतटीच्या उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला २-१ अशा गुणांनी नमवत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला महाराष्ट्र केसरीची गदा प्रदान करण्यात आली. (Maharashtra Kesari)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत गेले तीन दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत चटकदार कुस्त्या झाल्या. राज्यातील ८६० मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र केसरी गदेसाठी पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. केशरी कॉश्युम घातलेला पृथ्वीराज मोहोळे आणि उंची आणि अंगाने दणकट असलेल्या महेंद्र गायकवाडने निळा कॉश्युम घातलेला होता. सुरवातीपासून दोघांनी सावध पवित्रा घेतला. प्रारंभीच्या खडाखडीनंतर दोघेही एकमेकाचा अंदाज घेत होते. पंचांनी तीन वेळा कुस्ती करण्याची समज दिली. त्यानंतर पृथ्वीराजने एक गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रची पकड करण्याचा प्रयत्न केला पण सावध महिंद्रने सुटका करुन घेतली. पहिल्या फेरीत पृथ्वीराज १-० असा आघाडीवर होता.(Maharashtra Kesari)

दुसऱ्या फेरीत बरोबरी साधण्यासाठी महेंद्र आक्रमक झाला. पृथ्वीराजच्या पटात घुसण्याचा महेंद्र प्रयत्न करत होता. त्यामध्ये महेंद्रला पंचानी एक गुण दिला. कुस्ती १-१ अशी बरोबरीत आल्यावर निर्णायक गुण मिळवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न सुरू होते. महेंद्रकडून पृथ्वीराजचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शेवटच्या ४० सेंकदात पृथ्वीराजने महेंद्रला राऊंडच्या बाहेर ढकलत एक गुण वसूल केला. पंचाच्या निर्णयावर महेंद्रने आक्षेप घेतला. त्यांच्या समर्थकांनी मैदानावर धाव घेतली. पण पोलिसांनी समर्थकांनी बाहेर काढले. त्यानंतर पंचानी महेंद्रला कुस्ती खेळण्यासाठी बोलावले असता तो राऊंडच्या बाहेरच उभा राहिला. वेळ संपल्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषीत केले.(Maharashtra Kesari)

विजेत्या पृथ्वीराज मोहोळला उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता बारणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य संयोजक संजय जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

तत्पूर्वी झालेल्या गादी विभागात नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या मुरलीधर मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीकडे कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. कुस्ती सुरुवात होताच काही मिनिटात मुरलीधर मोहोळने शिवराज राक्षेला चितपट करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पंचाच्या निर्णयावर शिवराज राक्षेला अमान्य होता. शिवराज आणि त्यांच्या समर्थकांनी काही काळ गोंधळ घातला. शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरण्याचा आणि पंचांना लाथ मारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुध्द परभणीच्या साकेत यादव यांच्यात चांगली लढत लढत झाली. पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाडच्या विरोधात साकेत यादवने यशस्वी पकड घेत दोन गुण वसूल केले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने साकेतला आखाड्याच्या बाहेर घालवत एक गुण वसूल केला. पहिल्या फेरीनंतर साकेत यादव २-१ अशा गुणांनी आघाडीवर होता.

दुसऱ्या फेरीत महेंद्र गायकवाडने आक्रमक धोरण स्वीकारत साकेतची यशस्वी पकड करत दोन गुण वसूल केले. त्यानंतर झालेल्या चढाईत साकेतचा पटात घुसत ताबा मिळवून त्याला चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा :

भारत पुन्हा ‘वर्ल्ड ग्रुप-१’मध्ये

भारत दुसऱ्यांदा जगज्जेता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00