Home » Blog » Lonikar : तुझ्या बापाला मोदींनी ६००० रुपये पेरणीला दिले : लोणीकर

Lonikar : तुझ्या बापाला मोदींनी ६००० रुपये पेरणीला दिले : लोणीकर

by प्रतिनिधी
0 comments
Lonikar

जालना : तुझ्या बापाला मोदींनी सहा हजार रुपये पेरणीला दिले आणि तू आमच्या तंगड्या वर करतोस, या भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याने शेतकरी आणि युवकांनी संताप व्यक्त केला आहे. (Lonikar)

जालना जिल्ह्यातील परतूर येथील सोलर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्यावेळी बोलताना वादग्रस्त विधाने केली आहे. त्यांनी शेतकरी आणि तरुणांवर टीका केली. लोणीकर म्हणाले, सोशल मिडियावर चार पाच कार्टी असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरने केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलं. नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहीण योजनेतून पैसे दिले, तुझ्या अंगावरचे कपडे, आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायातील चप्पल आमच्यामुळेच, हातातलं ते मोबाईलचं डबडं आमच्यामुळे आहे. आमचेच घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. अशा शब्दात लोणीकर यांनी टीका केली. (Lonikar)

लोणीकर यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी समाचार घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दावणे म्हणाले, ही ब्रिटीशांची देशी आवृत्ती आहे. लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे, आमदारकी जनतेमुळे, तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे, तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे, नेतेगिरी जनतेमुळे, विधानसभेतील स्थान जनतेमुळे, यांचे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येत आहे. (Lonikar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00