जमीर काझी : मुंबई : वारकरी संप्रदायातील उजव्या विचारसरणीच्या घुसखोरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भाजपा यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाने गुरुवारी पुढचा अंक पहावयास मिळाला. वारकरी असल्याचे भासवत समाजात द्वेष निर्माण केलेल्या २० जणांची यादी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केली. या व्यक्तीचे भाजपा आरएसएस कडून त्यांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करून नेहमी धार्मिक द्वेष पसरविण्याचा काम करण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी केला.
राम कृष्ण हरी हा एकमेव मंत्र
विकास लवांडे म्हणाले,’ वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, एकादशी उपवास, आळंदी पंढरीची वारी आणि भजन, कीर्तन याबरोबरच शुद्ध आचार विचार.राम कृष्ण हरी’ हाच एकमेव मंत्र आहे. संप्रदायाचा ध्वज हा काऊच्या रंगाचा आहे भगवा नाही. तसेच वारकऱ्यांचा पोशाख पांढरीशुभ कपडे पांढरी टोपी फेटा असते, त्यामुळे ही मंबाजीची पार्टी की तुकोबांची पार्टी आहे, याचे उत्तर घुसखोराने द्यावे. (List of regressive individuals within the Warkari sect released)
वारकरी संप्रदायात कर्मकांडाला थारा नाही
विकास लवांडे म्हणाले की, वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग अर्थात श्री विठ्ठल रखुमाई आहे,वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, संत तुकाराम महाराजांची गाथा, पंचरत्न हरिपाठ इत्यादी सर्व संतांचे साहित्य,वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, योग याग विधी, होम हवन, यज, व्रत वैकल्ये, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी याला अजिबात थारा नाही. संत नामदेव महाराज ज्यांनी वारकरी संप्रदायाला पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला, ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस केला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन,वारकरी संप्रदाय समता बंधुता आणि मानवतेवर आधारलेला आहे इथे कोणत्याही प्रकारच्या जात धर्म लिंग पंथ अशा प्रकारचा भेदभाव नसतो व नाही, असेही त्यांनी सांगितले. (List of regressive individuals within the Warkari sect released)
उत्तरेतील मनुवादी महंत करतायेत वारकरी विचारधारा पुसण्याचा प्रयत्न
वारकरी संप्रदायाचा तत्कालीन संतांनी महाराष्ट्राच्या बाहेर तो विचार व तत्त्वज्ञान पोहोचवले मात्र अलीकडच्या पाच-दहा वर्षात उत्तर भारतीय असलेले मनुवादी, वैदिक परंपरेतील बाबा महंत यांनी महाराष्ट्रात येऊन वारकरी संप्रदायाची तत्वज्ञान व विचारधारा पुसण्याचा आटोकाठ सातत्याने प्रयत्न चालविलेला आहे.भाजपा आरएसएस कडून त्यांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते, असे विकास लवांडे यांनी स्पष्ट केले. विशेषता प्रदीप शर्मा, कालीचरण महाराज, धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर बाबा, स्वामी आनंद स्वरूप इत्यादी ठळक नावे आहेत हे लोक वारकरी संतांच्या तत्त्वज्ञानाच्या व विचारांच्या अतिशय विपरीत अशी मनुस्मृतीवर आधारित मांडणी करून समाजामध्ये जाती, वर्ण व धर्माच्या नावाने भेदाभेद करत असतात. सर्व संतांना धर्म मार्तंडांनी वर्ण वर्चस्ववादाच्या प्रतिष्ठेसाठी संतांना छळले, अतोनात त्रास दिला, सतत अपमान केला. त्यातून एकही संत सुटलेले नाहीत. त्याच संत विचारांची व तत्वज्ञानाची आजच्या धर्माध विचाराच्या किंवा मनुवादी विचारांच्या वैदिक परंपरेतील मंडळींना अडचण आहेच,
लवांडेच्या मते वारकरी संप्रदायातील घुसखोर असे
किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, चारुदत्त आफळे, बंडातात्या कराडकर,प्रकाश जवंजाळ,तुषार भोसले, अक्षय भोसले,संग्राम भंडारे,योगी निरंजन (विश्वस्त, आळंदी देवस्थान), एकनाथ सदगीर,ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज देवगड, संजय नाना धोंडगे, राणा वास्कर,चंद्रशेखर देगलूरकर, पंढरपूर,उद्भोद पैठणकर,शाम राठोड उर्फ भारतानंद सरस्वती, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज व निरंजन कोटेकर. (List of regressive individuals within the Warkari sect released)