Home » Blog » Lifetime Achievement : श्रीकांत डिग्रजकर यांना ‘जीवन गौरव’

Lifetime Achievement : श्रीकांत डिग्रजकर यांना ‘जीवन गौरव’

‘रंगबहार’ संस्थेची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
Lifetime Achievement
कोल्हापूर :  यंदाचा श्यामकान्त जाधव रंगबहार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १९ जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे. (Lifetime Achievement )
श्रीकांत डिग्रजकर सांगीतिक पार्श्वभूमी लाभलेल्या घराण्यात जयपूर घराण्याचे ख्यातकीर्त कलाकार ज्येष्ठ गानगुरू पं. सुधाकर बुवा डिग्रजकर यांचे पुत्र. सुरूवातीला त्यांच्यासोबत गाणी शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तबला वादनाकडे विशेष ओढा असल्याने गुरूवर्य कै. केशवराव धर्माधिकारी यांच्याकडे तबला शिक्षणास सुरूवात केले. कै. पं. निवृत्तीबुवा सरनाईक, बुजुर्ग तबलावादक उस्ताद कै. गणपतराव कवठेकर, कै. यशवंत अष्टेकर यांच्याकडून तबला वादनातील गुपिते आणि विकास या विषयी मार्गदर्शन घेतले.(Lifetime Achievement )
१९७५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सहवासात त्यांनी कथा, पटकथा, संवादलेखन त्याबरोबर बाबांचे स्वीय सहायक तसेच जयप्रभा स्टुडिओचे महा. व्यवस्थापक पदी काम केले. त्यावेळी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम, सुलोचनादीदी, विश्राम बेडेकर, ग. दि. माडगूळकर, बाबा आमटे यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला.(Lifetime Achievement )
गेली १४० वर्षे भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रात अविरत कार्यरत असणाऱ्या गायन समाज देवल क्लबच्या कार्यकारी मंडळामध्ये १९९९ ते आजअखेर गेली २५ वर्षे विश्वस्त व संचालक पदावर ते कार्य करीत आहेत. या काळात सातशेहून अधिक संगीत संमेलने, महोत्सव आणि सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच संस्थेच्या कला संकुलाचे अडीच कोटीचे काम पूर्ण केले.
अभिनव उपक्रमशीलता
ज्येष्ठ चित्रकार व लेखक कै. श्यामकान्त जाधव यांनी स्थापन केलेल्या रंगबहार या संस्थेच्या स्थापनेपासून सहकारी, संस्थेचे कार्यवाह ते पाच वर्षे संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. ‘रंगबहार’च्या माध्यमातून मान्यवर कलाकारांबरोबर उदयोन्मुख चित्रकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, व्याख्याने, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, कवी संमेलने, चित्रकला स्पर्धा यां सारख्या विविध उपक्रमासोबत ‘मैफल रंग सुरांची’ या अभिनव उपक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे सदस्य म्हणून अनेक वर्षे कार्य केले. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजनही त्यांनी केले.(Lifetime Achievement )
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र या संस्थेचे सुरूवातीपासून कार्यवाह म्हणून काम करताना विविध सांस्कृतिक नाट्य विषयक व कलाविषयक उपक्रमाचे आयोजन केले. तसेच देवल क्लबच्या वतीने संगीत विषयावरील विश्वकोश निर्मितीसाठी १८ ते २० लेखांचे लेखन केले.
मराठी संगीत, शास्त्रीय संगीत, मराठी संस्कृती, चित्रकला, सिनेमा, नाटक, लेखन, जुना महाराष्ट्र, जुने कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान, एकूण कला, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात गेली ७० हून अधिक वर्षे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केल्याचे ‘रंगबहार’च्या व्ही. बी. पाटील, धनंजय जाधव, संजीव संकपाळ, प्रा अभिजीत कांबळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :

‘या’ संशोधनासाठी नऊ कोटींचे बक्षीस

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00