कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महाराजांशी अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणातील संशयित प्रशांत कोरटकर यांचा जामिन अर्ज दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी फेटाळला. जामिन अर्ज फेटाळल्याने कोरटकरांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Koratkar bail denied)
कोरटकरांचा जामिन अर्ज फेटाळावा अशी मागणी सरकारी वकील विवेक शुक्ल, इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे, जुना राजवाडा पोलिसांनी काल सोमवारी (दि.१७) झालेल्या सुनावणीत केली होती. आज न्यायालयाने प्रशांत कोरटकरांचा जामिन फेटाळला असून त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी सांगितले. विवेक शुक्ल म्हणाले, हा अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षातर्फे सात दिवसासाठी अंतरिम जामीन वाढवून मिळावा, अशी न्यायालयाला विनंती केली होती. त्यासाठी उच्च न्यायालयातील खटल्याचा दाखला दिला होता. पण उच्च न्यायालयाचा दाखवला दिलेल्या खटल्यात आरोपी हा पोलिसांकडे चौकशीसाठी हजर झाला होता. (Koratkar bail denied)
या प्रकरणात प्रकाश कोरटकर हा पोलिसांकडे हजर झालेला नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले, असे विवेक शुक्ल यांनी सांगितले. न्यायालयाने सात दिवसाचा अंतरिम जामीन मिळावा ही बचाव पक्षाची विनंती फेटाळली. जामिन कोणत्या कारणासाठी फेटाळला हे बुधवारी ऑर्डर आल्यावर स्पष्ट होईल असे ते म्हणाले. कदाचित राष्ट्रपुरुषाविषयी अवमानकारक उद् गार काढल्याने न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळले असावा, असेही शुक्ल म्हणाले. (Koratkar bail denied)
काल सोमवारी (दि.१७) न्यायालयात सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकीलांनी युक्तीवाद केला होता. त्यामध्ये सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकरने शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण सरंक्षण देत आहात का?असा प्रश्न उपस्थित केला होता. ॲड. असीम सरोदे यांनी कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करून दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइलमधील डेटा डिलिट केला असल्याने तपासासाठी त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. (Koratkar bail denied)
बिळात लपलेल्या कोरटकरला अटक करा
कोरटकराचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्या जीवाला धोका आहे म्हणून कोरटकर याच्याविरोधात फिर्याद दिली नव्हती तर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमात जिजाऊ यांच्याविषयी हीन आणि विकृत विधाने कोरटकरने केल्याने व्यथित होऊन हा विषय मी लोकांसमोर आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके दिवस कोरटकर कायद्यातील तरतुदीचा आधार करुन जामिन फेटाळावा यासाठी प्रयत्न करत होता. राष्ट्रपुरुषांविषयी आणि तेढ निर्माण करणारा कोरटकर कुठल्या बिळात लपला आहे हे आता पोलिसांनी शोधले पाहिजे. पोलिसांनी त्याला बिळातून बाहेर काढून अटक केली पाहिजे. तो एकटा आहे की त्यांच्या मागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली. (Koratkar bail denied)
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय
मोदी गेल्या जन्मी शिवाजी महाराज होते