जयसिंगपूर; प्रतिनिधी : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. सहकार, समाजकारणाच्या माध्यमातून अण्णांनी भरपूर काम केले आहे. त्यांचे हे कार्य, विचार मंचच्या माध्यमातून तेवत राहील. गेले अनेक वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याची परंपरा विचार मंचने जपले असल्याचे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी केले. (Kolhapur)
जयसिंगपूर येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त देशभक्त .रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत भाषणात दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार म्हणाले, पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. आण्णांचे विचार समाज्यात रुजविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून ते कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. सुरेश कुऱ्हाडे म्हणाले, मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार यांनी स्व. रत्नप्पाण्णा कुंभार यांचे कार्य विचार पुरस्काराच्या माध्यमातून जपले आहे. मंचच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गुणवंत रत्नांचा गौरव केला आहे. बंडा मिणियार हेच स्व. कुंभार यांच्या विचाराचे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकूळचे चेअरमन अरुण डोंगळे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस सुरेशराव कुराडे, श्रीमती सरोज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वभर चौधरी यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार समाज भूषण पुरस्कार, ख्यातनाम विद्रोही कवी अनंत राऊत यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार साहित्यरत्न व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष कै.डॉ.एस.के.पाटील यांना मणोत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार क्रांती पुरस्कार डॉ.श्रीवर्धन पाटील यांनी स्वीकारला तर इतरांना देण्यात आला.
यावेळी सौ. रजनीताई मगदूम, पुंडलिकराव जाधव, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बाबगोंडा पाटील, अशोकराव घोरपडे, अमरसिंह निकम, सुभाष भोजणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभा कोळी, मुसा डांगे, चंद्रकांत चव्हाण, अशोकराव कोळेकर, श्रीमती स्वाती घाटगे यांच्यासह कुंभार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सौ. मंजू मिणियार यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (Kolhapur)