कोल्हापूर; प्रतिनिधी : राजस्थान जयपूर येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या आर्या मोरे, प्रणाली चव्हाण स्नेहल सुतार, समिक्षा पोवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा खेळवली जाणार आहे. आर्या मोरे हिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. (Kolhapur Football)
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मुंबई कुपरेज येथे गेली १४ दिवस सूरू असलेल्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीरातून महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघासाठी खेळाडूंची नांवे नुकतीच जाहीर करणेत आली. यामध्ये के.एस.ए.च्या वतीने पाठविलेल्या सात मुलींपैकी गोलकीपर स्नेहल सुतार, लेप्ट विंग आर्या मोरे, सेंटर मिडफिल्डर-समिक्षा पोवार, राईट विंग प्रणाली प्रविण चव्हाण यांची निवड झालेली आहे. स्नेहल सुतार, आर्या मोरे, समिक्षा पोवार या ताराराणी विद्यापीठ फुटबॉल संघाच्या खेळाडू आहेत. के.एस.ए.फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी तसेच प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड व शलाका गवळी व अमित शिंत्रे यांनी निवड चाचणीचे कामकाज केले.
या खेळाडूंना संस्थेचे पेट्रन-इन्-चीफ् खासदार शाहू छत्रपती युवराज संभाजीराजे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वे.इं.फु.असो., महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे, सचिव माणिक मंडलिक, सह सचिव अमर सासने व फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी यांचेही सहकार्य व प्रोत्साहन लाभले आहे.
हेही वाचा :
- अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा
- मोर रोज येतो आजीला भेटायला (व्हिडिओ)
- वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार