Home » Blog » ECIR against Actors: प्रकाश राज, देवरकोंडासह २९ जणांविरूद्ध गुन्हा

ECIR against Actors: प्रकाश राज, देवरकोंडासह २९ जणांविरूद्ध गुन्हा

by प्रतिनिधी
0 comments
ECIR against Actors

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज, अभिनेता राणा दग्गुबती आणि विजय देवरकोंडा यांच्यासह २९ जणांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.  सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून बेकायदेशीर सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) नोंदवला आहे. (ECIR against Actors)

ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत येते. पंजगुट्टा, मियापूर, सायबराबाद, सूर्यपेट आणि विशाखापट्टणम येथे पाच वेगवेगळे एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली. (ECIR against Actors)

हे प्रकरण जंगली रम्मी, ए२३, जीटविन, पॅरिमॅच, लोटस३६५ आणि मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर प्लॅटफॉर्मसाठी सशुल्क जाहिरातींशी संबंधि तआहे. या अ‍ॅप्सचे प्रमोशन करण्यासाठी या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात आर्थिक भरपाई मिळाली. त्यापैकी बरेच जण कौशल्य-आधारित गेम म्हणून भासवले जात होते, परंतु त्यामुळे जुगारासास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

अभिनेता राणा दग्गुबती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा, मंचू लक्ष्मी, प्रणीता आणि निधी अग्रवाल यांच्यासह अनन्या नागेला, सिरी हनुमंथू, श्रीमुखी, वर्षानी सौंदरराजन, वासंती कृष्णन, शोबा शेट्टी, अमृता चौधरी, नयनी पवानी, नेहा पठाण, पांडू, पद्मावती, इम्रान खान, विष्णू प्रिया आणि श्यामला यांसारख्या टीव्ही आणि माध्यमांतील प्रसिद्ध व्यक्तींचा गुन्हा नोंदवलेल्यांमध्ये समावेश आहे. तसेच डिजिटल निर्माते हर्षा साई, बय्या सनी यादव, चवतेजा, रिथू चौधरी, बंडारू शेषानी सुप्रीता, अजय, सनी, सुधीर आणि यूट्यूब चॅनल ‘लोकल बॉय नानी’आणि किरण गौड आणि बेटिंग प्लॅटफॉर्ममागील व्यवस्थापन संघांचीही नावे यात समाविष्ट आहेत.

काही जाहिराती मनोरंजन किंवा सामाजिक सेवेच्या रूपात सादर केल्या गेल्यामुळे जनतेचा रोष ओढवला गेला. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. संबंधितांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. एका तक्रारदाराने युट्यूबवरील या व्यक्तिरेखांच्या जाहिरातींमुळे प्रभावित होऊन ₹३ कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. (ECIR against Actors)
या प्रकरणात ज्या व्यक्तींची नावे आहेत त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी अनेकांनी आम्ही कोणतेही बेकायदा कृत्य केले नसल्याचे जाहीर केलेल्या निवेदनांत म्हटले असून, नैतिक आणि कायदेशीर बाबी माहिती घेतल्यानंतर त्यांनी एंडोर्समेंट डील रद्द केल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा :
मतदार यादी पुनर्विलोकनासाठी ‘आधार’चा विचार करा : सर्वाेच्च न्यायालय
फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नर्सला वाचवण्यासाठी याचिका

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00