Home » Blog » IPS Puran suicide case : तुमचं नाटक थांबवा : राहूल गांधीची सरकारवर टीका

IPS Puran suicide case : तुमचं नाटक थांबवा : राहूल गांधीची सरकारवर टीका

by प्रतिनिधी
0 comments
IPS Puran suicide case

नवी दिल्ली : हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक वाय.पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन राहूल गांधी यांनी हरियाणातील सैनी सरकारला चांगलेच खडसावले आहे. तुमचं नाटक थांबवा आणि पूरन अंत्यसंस्कारला परवानगी द्या असे हरियाणा सरकारला सुनावले आहे.  वरिष्ठ पोलिस अधिकारी पूरन यांनी तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर देशभर एकच खळबळ उडाली आहे. पूरन कुमार यांच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (IPS Puran suicide case)

सुसाईड नोटमध्ये पोलिस अधिक्षक, महासंचालकांची नावे

पून कुमार यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये वरिष्ठांनी दिलेल्या वागणुकीचा उल्लेख आणि अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. तसेच हरियाणाचे पोलिस महासंचालक कूपर आणि रोहतकचे पोलिस अधीक्षक बिजारनिया यांची नावेही चिठ्ठीत नमूद करण्यात आली आहेत. या घटनेनंतर पोलिस दलासह राज्यभर खळबळ उडाली. त्यांचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक बिजारनिया यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच पोलिस महासंचालक कपूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. (IPS Puran suicide case)

पूरन कुमारांच्या कुटुंबाला न्याय देण्यात सरकार अपयशी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी पूरन कुमार यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे पूरन कुमार यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप गांधी यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री सैनी यांनी पूरन कुमार यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र तीन दिवस उलटून गेले असून सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाहीत. पूरन कुमार यांना दोन मुली असून त्यांनी वडील गमावले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गांधी यांनी केला. (IPS Puran suicide case)

कोट्यवधी दलितांमध्ये चुकीचा संदेश

हरियाणा सरकारकडून कारवाईसाठी विलंब होत असल्याने कोट्यवधी दलितांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. ही एक शोकांतिका आहे. पूरन एक आयपीएस अधिकारी होते. तुम्ही कितीही यशस्वी किंवा बुद्धिमान असलात तरी तुम्ही चिरडले जाऊ शकता असा चुकीचा संदेश कोट्यवधी नागरिकांमध्ये जात आहे. पूरन कुमार यांच्या मुलींना तुम्ही दिलेले वचन पूर्ण करा आणि अंत्यसंस्काराला परवानगी द्या. तुमचं सुरू असलेले नाटक थांबवा आणि पूरन यांच्या कुटुंबावर दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा,  अशी मागणी राहूल गांधी यांनी केली आहे. (IPS Puran suicide case)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00