Home » Blog » Indrajeet Sawant: सावंत थोड्या दिवसाचा पाहुणा…

Indrajeet Sawant: सावंत थोड्या दिवसाचा पाहुणा…

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी

by प्रतिनिधी
0 comments
Indrajeet Sawant

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू’, अशी दर्पोक्ती करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.(Indrajeet Sawant)

सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरनी दिलेले जिवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा सावंत यांना धमकी देण्यात आली आहे. यू ट्यूबवर केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यावर, अशा धमक्यांना घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

‘छावा’ चित्रपटावर इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजीराजे यांना मुघलांना पकडून देण्यात ब्राह्मण कारभाऱ्यांनी पकडून दिल्याचा दावा केला होता. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनी  इतिहास संशोधक सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले. कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांनी ज्या मोबाईलवर धमकी आली तो मोबाईलही पोलिसांना तपासासाठी दिला आहे. कोल्हापूर पोलीस कोरटकर यांचा नागपूरमध्ये शोध घेत आहेत. (Indrajeet Sawant)

एकीकडे कोरटकर यांचा पोलीस शोध घेत असताना सावंत यांना यू ट्यूबवर केशव वैद्यने धमकी दिली आहे. वैद्य यांनी सावंत यांना धमकीचा मेसेच करताना  ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू’, अशी नव्याने धमकी दिली आहे. एकीकडे इतिहास संशोधक सावंत यांना धमक्या मिळत असताना नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी घराबाहेर पोलिस बंदोबस्त असतानाही नागपूरमधून पलायन केले आहे. कोरटकर मध्यप्रदेशमध्ये पळून गेले आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Indrajeet Sawant)

इतिहास संशोधक सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकर यांना अटक करा अशी मागणी राज्यभरातून होत आहे. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) कोल्हापुरातही शिवाजी चौकात शिवप्रेमींनी निदर्शने केली. कोरटकर यांना अटक न झाल्यास कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारु, असा इशाराही शिवप्रेमींनी दिला आहे.

हेही वाचा :

दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकल्या

पत्नीकडून छळ; टीसीएस मॅनेजरची आत्महत्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00