Home » Blog » India’s victory over Australia : भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय

India’s victory over Australia : भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय

by प्रतिनिधी
0 comments
India's victory over Australia

नवी दिल्ली : पश्चिम ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड करारा येथील हेरीटेज बँक स्टेडियममध्ये झालेल्या टी- २० क्रिकेट सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील अंतिम सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात आठ गडी गमावून १६९ धावा करत माफक आव्हान ठेवले. सलामीवीर अभिषेक शर्माने २८, उप कर्णधार शुभमन गिलने ४६, शिवम दुबेने २२ तर सूर्यकुमार यादवने २० धावा केल्या. अक्षर पटेलची नाबाद २१ धावांची खेळीही निर्णायक ठरली. (India’s victory over Australia)

भारतानेचे १६८ धावांचे माफक आव्हान पेलताना ऑस्ट्रेलिया फलंदाजांची फिरकी गोलंदाजीपुढे डाळ शिजली नाही. कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधीक ३० धावा केल्या. त्या खालोखाल मॅट शॉर्टने २५ धावा केल्या. भारतीय संघाची फिरकी कमालिची प्रभावी ठरली. वॉशिंग्टन सुंदरने तीन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियासचा डाव ११९ धावावर आटोपला. भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला. (India’s victory over Australia)

पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाने रद्द केला. दुसरा सामन्या ऑस्ट्रेलियाने जिंकला. तिसरा आणि चौथा सामना जिंकून भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. (India’s victory over Australia)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00