महेंद्रगिरी (तमिळनाडू) : भारताचे पहिले अंतराळवीर शुभांशू शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका(आयएसएस) वर आहेत. त्यापाठोपाठ देशाने अंतराळ प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, गगनयान सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टम (एसएमपीएस) साठी पात्रता चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आता गगनयानाचे यशस्वी उड्डाण झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून माणूस अंतराळात पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल. (India’s crewed mission)
शुक्रवारी तामिळनाडूतील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ३५० सेकंदांची हॉट टेस्ट घेण्यात आली. त्यामुळे उड्डाण रद्द होण्यासारख्या परिस्थितीत या सिस्टमची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. त्यामुळे अंतराळवीरांना अवकाशात सोडण्याच्या टप्प्याजवळ ‘इस्रो’ पोहोचला आहे. या मोहिमेत सध्या आयएसएसवर असलेल्या शुभांशू शुक्ला यांचा समावेश असेल.
गगनयानमधील प्रणोदन प्रणाली (प्रपोल्शन सिस्टम)
प्रणोदन प्रणाली (प्रपोल्शन सिस्टम) ही गगनयान सर्व्हिस मॉड्यूलच्या इंजिनसारखी आहे. ती अंतराळयान अंतराळात पोहोचल्यानंतर यानाची हालचाल आणि त्याचे नियंत्रण करण्यास मदत करते. यात कक्षा समायोजित करणे, दिशा बदलणे, पृथ्वीवर परत येण्यापूर्वी इंजिनची गती कमी करणे आणि प्रक्षेपण दरम्यान काही चूक झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.(India’s crewed mission)
ही प्रणाली दोन प्रकारच्या इंधनाच्या विशेष मिश्रणावर चालते. त्याला बाय-प्रपोलंट म्हणतात आणि त्यात दोन प्रमुख भाग आहेत.
लिक्विड अपोजी मोटर्स (LAM), हे मोठ्या हालचाली हाताळते आणि रिअॅक्शन कंट्रोल सिस्टम (RCS) थ्रस्टर्स हे अंतराळयानाची स्थिती वळवण्यास किंवा समायोजित करण्यास मदत करते.
यानाची वास्तविक प्रणाली अवकाशात कशी कार्य करेल असे मॉडेल तयार करून इस्रोने या सर्वांची चाचणी घेतली. या मॉडेलमध्ये इंधन टाक्या, दाबासाठी हेलियम वायू आणि सर्व आवश्यक पाईप्स आणि कंट्रोल्स होती.(India’s crewed mission)
इस्रोने सामान्य आणि आपत्कालीन अशा वेगवेगळ्या परिस्थितीत २५ वेळा या मॉडेलची चाचणी केली. एकूणच अंतराळवीरांसाठी इंजिन सुरक्षित आणि सज्ज आहे याची खात्री करण्यासाठी ते १४,००० सेकंदांपेक्षा जास्त काळ चालू होते.
चाचणीचे महत्त्व
अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे हे गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीची चाचणी यशस्वी झाल्याने भारतीय अवकाश संशोधन संस्थेने एक मोठे पाऊल टाकले आहे. ३५० सेकंदांची ही चाचणी होती. प्रक्षेपणाच्या मध्यावरच हे मिशन थांबवावे लागले तर या किंवा अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही इंजिन योग्यरित्या काम करते की नाही हे या चाचणीमध्ये तपासण्यात आले. ही प्रणाली अपेक्षेप्रमाणे काम करते असे ‘इस्रो’ने सांगितले.
एसएमपीएस नावाची ही इंजिन प्रणाली इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (एलपीएससी) ने विकसित केली आहे. तमिळनाडूतील महेंद्रगिरी येथील त्यांच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही चाचणी करण्यात आली.
हेही वाचा :
शिवकालीन स्थापत्य आणि लष्करी महत्त्व