Home » Blog » PM Modi : ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावर

PM Modi : ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी घेणार कुवेतच्या सर्वोच्च नेत्यांची भेट

by प्रतिनिधी
0 comments
PM Modi

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तब्बल ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे शेख मेशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेत भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. (PM Modi)

गेल्या ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान कुवेतचा दौरा करत आहेत. कुवेतच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत लिहले की, भारत आणि कुवेत हे व्यापार आणि ऊर्जा भागिदार नाहीत, तर, पश्चिम आशियामध्ये सुरक्षा आणि शांततेमध्ये समान हित आहे. कुवेतसोबत असलेल्या संबंधांना आम्ही खूप महत्व देतो.

कुवेत दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतमधील सर्वोच्च नेत्यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत. आज (दि.२१) कुवेतमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. (PM Modi)

४३ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी दिली होती भेट

१९८१ साली भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतचा दौरा केला होता. तर २००९ साली भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कुवेतला भेट दिली होती. भारत आणि कुवेतमध्ये ऐतिहासिक व्यापारी संबंध आहेत. कुवेत देशात तेलाचा शोध लागण्यापूर्वी कुवेत आणि भारत या देशांमध्ये खजूर आणि घोड्यांचा वापर व्हायचा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक या विषयांवर चर्चा होऊ शकते. तर कुवेतच्या शेख साद अल अब्दुल्ला क्रीडा संकुलात ‘हाला मोदी’ कार्यक्रमाची होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00