Home » Blog » विचारांच्या लढाईत आ. ऋतुराज पाटील यांना साथ द्या : शिवाजीराव परुळेकर

विचारांच्या लढाईत आ. ऋतुराज पाटील यांना साथ द्या : शिवाजीराव परुळेकर

विचारांच्या लढाईत आ. ऋतुराज पाटील यांना साथ द्या : शिवाजीराव परुळेकर

by प्रतिनिधी
0 comments
Ruturaj Patil

कोल्हापूर; प्रतिनिधी :  सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेद आणि त्याच्या जोडीला ईडीचा होत असलेला गैरवापर आणि दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रगतीचा विचार घेऊन पुढे जात असलेली महाविकास आघाडी यांच्यात ही निवडणूक होत आहे. या लढाईत तत्व आणि विचार घेऊन काम करणारे आ. ऋतुराज पाटील यांना भक्कम साथ द्या असे आवाहन समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते शिवाजीराव परुळेकर यांनी केले.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी साळोखे नगर, मोहिते कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोरे माने नगर, पार्वती पार्क, दत्त कॉलनी आदी भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना परुळेकर यांनी विनयशील व सुसंस्कृत आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मोठा विकास घडवून आणल्याचे सांगितले.

आ. सतेज पाटील म्हणाले, थेट पाईपलाईनमुळे नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळायला सुरुवात झाली आहे. आ. ऋतुराज पाटील यांनी ड्रेनेज, रस्ते, विरुंगळा केंद्र, ५ अभ्यासिका, १४ क्रीडांगण अशी अनेक काम पूर्णत्वास नेली. रोजगार निर्मितीसाठी शेंडा पार्क येथे आयटी पार्क विकसित करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. आम्ही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहोत. कामाच्या जोरावर आमदार ऋतुराज पाटील यांना विजयी करा.

 अॅड. शिवाजी राणे , अॅड. व्ही. आर. पाटील, अमर सरनाईक म्हणाले, पुंडलिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धीरज पाटील, रमेश पाटील, सुरेश सरनाईक, श्रीधर राऊत, माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्यासह नागरिक, तरूण मंडळे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00